मुंबई : (Modi Express) गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मंत्री, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ शुक्रवार, दि. ११ रोजी दुपारी १२ वाजता दादर रेल्वे स्थानकावरून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाली. दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर मंत्री नितेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवून विशेष रेल्वेला मार्गस्थ केले. यावेळी गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात उत्साहात निरोप दिला.
गणेशोत्सवाच्या काळात रेल्वेचे आरक्षण मिळणे कठीण होते. त्यातच खासगी वाहनांचे वाढलेले भाडे आणि प्रवासासाठी होणारी गैरसोय यामुळे कोकणातील चाकरमान्यांसमोर मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत ‘मोदी एक्सप्रेस’च्या माध्यमातून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Modi Express)
गणेशोत्सव आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदाने साजरा करता यावा, यासाठी दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. यंदा या उपक्रमाचे १४वे वर्ष असून, गेल्या १४ वर्षांपासून गणेशभक्तांसाठी स्वखर्चाने ही विशेष प्रवास व्यवस्था केली जात असल्याचे सांगण्यात आले. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आनंददायी व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. (Modi Express)
कोकणवासीय गणेशभक्तांना गणेशोत्सव आपल्या गावी कुटुंबीयांसोबत आनंदाने व उत्साहात साजरा करता यावा, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’च्या माध्यमातून चाकरमान्यांच्या कोकण प्रवासाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
पहिल्या ‘मोदी एक्सप्रेस’ला चाकरमान्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवासाठी आपल्या गावाकडे निघालेल्या प्रवाशांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. बाप्पाच्या आगमनाची ओढ आणि कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. दरम्यान, या उपक्रमातील दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ रविवार, १३ सप्टेंबर रोजी कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहे. दरवर्षी चाकरमान्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाबद्दल गणेशभक्तांनी समाधान व्यक्त करत मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले. (Modi Express)
गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ‘मोदी एक्सप्रेस’मुळे नियमित रेल्वे गाड्यांवरील गर्दीचा ताण काही प्रमाणात कमी होण्यासही मदत होणार आहे. कोकणवासीय गणेशभक्तांना सुरक्षित आणि आनंददायी प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. (Modi Express)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.