ऊर्जा नेतृत्व परिषदेत अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र यांना ‘एनर्जी लीडरशिप अवॉर्ड’

महावितरणला ‘अ‍ॅडॉप्टिंग एआय इन एनर्जी’ पुरस्कार

    11-Sep-2026
Energy Leadership Summit & Awards 
 
मुंबई : (Lokesh Chandra Energy Leadership Award) ऊर्जा परिवर्तनाची प्रभावी अंमलबजावणी, सौर ऊर्जेद्वारे शेतीला दिवसा वीज, ग्रामीण अर्थकारणाला बळ, गुंतवणूक व रोजगाराच्या संधी, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि आर्थिक शिस्त या क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना ‘एनर्जी लीडरशिप अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.
 
वीज मागणीचा अचूक अंदाज घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याबद्दल महावितरणला ‘अ‍ॅडॉप्टिंग एआय इन एनर्जी अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या सहाव्या ईटी एनर्जी लीडरशिप समिट २०२६मध्ये गुरुवारी, दि. १० सप्टेंबर रोजी हे पुरस्कार देण्यात आले. (Lokesh Chandra Energy Leadership Award)
 
ऊर्जा क्षेत्रातील भविष्यातील दिशेवर मंथन
 
भारताच्या वाढत्या ऊर्जा गरजा आणि भविष्यातील दिशा यावर मंथन करण्यासाठी ‘सहावी ईटी एनर्जी लीडरशिप समिट २०२६’ आयोजित करण्यात आली होती. दोन दिवसीय परिषदेत ऊर्जा क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. केंद्र आणि राज्य सरकारांतील वरिष्ठ अधिकारी, वीज क्षेत्रातील अधिकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे प्रमुख, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान पुरवठादार यावेळी उपस्थित होते. (Lokesh Chandra Energy Leadership Award)
 
या परिषदेत प्रमुख व्याख्याते म्हणून लोकेश चंद्र यांनी महाराष्ट्रातील सौर ऊर्जेमुळे बदलणारे ग्रामीण अर्थकारण, गुंतवणूक, रोजगार, शेतीसाठी दिवसा वीज आणि अन्य सकारात्मक बदलांची माहिती दिली. महाराष्ट्रातील महावितरणच्या सौर ऊर्जा उपक्रमांमुळे शेतीच्या वीजपुरवठ्यात मोठे परिवर्तन होत असल्याचे त्यांनी सांगितले. (Lokesh Chandra Energy Leadership Award)
 
सौर कृषिवाहिनी योजनेला गती
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणने ऊर्जा परिवर्तनाच्या माध्यमातून आपल्या कामकाजात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अंतर्गत आतापर्यंत ६,२५० मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प पूर्ण झाले आहेत. या प्रकल्पांमुळे १७ लाख ५२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. (Lokesh Chandra Energy Leadership Award)
 
महावितरणच्या माहितीनुसार, जगातील सर्वात मोठ्या १६ हजार मेगावॅट विकेंद्रित सौर ऊर्जा उपक्रमांपैकी हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. सौर ऊर्जेमुळे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना, गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. (Lokesh Chandra Energy Leadership Award)
 
पीएम कुसुम-बी योजनेंतर्गत देशात आतापर्यंत १७ लाख ४२ हजार सौर कृषिपंप कार्यान्वित झाले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात ६५ टक्के म्हणजेच ११ लाख ५४ हजार सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. (Lokesh Chandra Energy Leadership Award)
 
पीएम सूर्यघर योजनेत महाराष्ट्राची कामगिरी
 
पीएम सूर्यघर योजनेसाठी महावितरणला केंद्र शासनाचे आठ पुरस्कार मिळाले आहेत. राज्यात आतापर्यंत ७ लाख ७७ हजार ५१६ घरांवर २,९४७ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. (Lokesh Chandra Energy Leadership Award)
 
सौर ऊर्जेचा वाढता वापर, शेतीला दिवसा वीजपुरवठा आणि विकेंद्रित ऊर्जा प्रकल्पांमुळे वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम आणि शाश्वत करण्यास मदत होत आहे. (Lokesh Chandra Energy Leadership Award)
 
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराची दखल
 
महावितरणने वीज मागणीचा अचूक अंदाज घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘एआय/एमएल-ड्रिव्हन डिमांड फोरकास्टिंग इंजिन’ या तंत्रज्ञानाच्या कामगिरीची दखल घेत महावितरणला ‘अ‍ॅडॉप्टिंग एआय इन एनर्जी अवॉर्ड’ने गौरविण्यात आले. (Lokesh Chandra Energy Leadership Award)
 
महावितरणने १२ सप्टेंबर २०२४पासून हे एआय-आधारित स्वयंचलित तंत्रज्ञान पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे वीज खरेदी खर्च, मागणी-पुरवठ्यातील तफावत, ग्रीड स्थैर्य आणि आर्थिक नियोजनात सुधारणा झाली आहे. महावितरणच्या माहितीनुसार, या तंत्रज्ञानामुळे आतापर्यंत वीज खरेदीत सुमारे १,२०० कोटी रुपयांची बचत झाली आहे.
 
पुरस्कार स्वीकारणारे अधिकारी
 
सेवानिवृत्त केंद्रीय ऊर्जा सचिव अनिल राजदान यांच्या हस्ते लोकेश चंद्र यांना ‘एनर्जी लीडरशिप अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. महावितरणचा ‘अ‍ॅडॉप्टिंग एआय इन एनर्जी अवॉर्ड’ लोकेश चंद्र यांच्यासह कार्यकारी संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता संतोष सांगळे आणि मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) भूषण कुलकर्णी यांनी स्वीकारला. (Lokesh Chandra Energy Leadership Award)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी लोकेश चंद्र तसेच महावितरणच्या सर्व अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
 
 




संबंधित मजकूर