
मुंबई - Ganpati Bappa Morya Colors Marathi कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’च्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना एक अत्यंत भावूक दैवी अनुभव मिळणार असून उत्तम रंजक आणि उत्सवपूर्ण वातावरणात मिळणारा हा अनुभव आगामी गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारा आहे, या मालिकेत सध्या एका बाजूला भक्तीच्या चातुर्मासात दैवी नियमांचा पेच उलगडत असतानाच, दुसरीकडे साक्षात बालगणेशाच्या आगमनाने संपूर्ण वातावरण चैतन्यमय होणार आहे. सध्या मालिकेच्या कथानकात चातुर्मासाच्या पोथीवरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. देवीच्या महालातून अचानक चातुर्मासाची दिव्य पोथी आणि स्वयंपाकघरातील नैवेद्य गायब झाल्याने देवीसह सर्वांचीच चिंता वाढते. नेमक्या याचवेळी देवीच्या महालात एका खट्याळ बालरूपाचे आगमन होते. लहान लहान पावलांनी वाड्यात फिरणारे आणि खट्याळपणे हसणारे हे बालरूप दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष बालगणेश आहेत. विशेष म्हणजे त्याच्याच हातात ती हरवलेली चातुर्मासाची पोथी असते आणि तो अत्यंत गोड शब्दांत, “पुढचे अकरा दिवस या पोथीची जबाबदारी माझी!” असे सांगत देवीच्या महालात प्रवेश करतो.
योगायोगाने याच काळात गणेश चतुर्थीचा सण असल्यामुळे, महालात बालगणेशाचे अत्यंत उत्साहात, वाजत-गाजत आणि भक्तिभावाने स्वागत केले जाते. बालगणेशाचे हे रूप पाहून देवी पार्वतीचे रूप असलेली तुळजाभवानी भारावून जाते. विशेष म्हणजे असुरांनी मिळवलेले ब्रम्हास्त्र निष्प्रभ करण्यासाठी तुळजाईने सध्या बालरूप घेतले असून बालगणेशही देवीच्या बालरूपाकडे पाहून आनंदित होतो पुढचे अकरा दिवस बालगणेशाच्या या आगमनामुळे महालातील वातावरण पूर्णपणे बदलून जाते. त्याच्या खट्याळ लीला आणि त्याला देवीच्या बालरूपामुळे तयार झालेली बालगोपाळांच्या टोळीची मिळालेली साथ यामुळे एक अत्यंत लोभस, खट्याळ, खेळकर कथानक प्रेक्षकांपुढे उलगडत जाते. Ganpati Bappa Morya Colors Marathi
या आनंददायी प्रवेशासोबतच आगामी भागात चातुर्मासाच्या कथा आणि भक्तीचे नवे पैलूही उलगडत जातात, बालगणेशाचा हा गोड प्रवेश आणि त्यानंतर घडणाऱ्या रंजक घडामोडी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार असून, मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता यामुळे आणखी वाढली आहे. तुळजापुरात बालगणेशाचे खट्याळ आगमन तर होणारच आहे पण कथेत देखील काय काय नवीन बघायला मिळणार आहे. Ganpati Bappa Morya Colors Marathi