मुलाची वाट पाहत आईने घेतला अखेरचा श्वास; अंत्यसंस्कारासाठी अवघ्या पाच तासांची पॅरोल

    11-Sep-2026   
Chinmoy Krishna Das Parole

मुंबई :
(Chinmoy Krishna Das Parole) बांगलादेशातील तुरुंगात असलेले हिंदू कार्यकर्ते संत चिन्मय कृष्ण दास यांना त्यांच्या आईच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी गुरुवारी पाच तासांची पॅरोल देण्यात आली. नोव्हेंबर २०२४ मध्ये अटकेनंतर ते तुरुंगात असून, त्यांच्या जामीन अर्जाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. चिटगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद जाहिदुल इस्लाम मिया यांनी दास यांच्या कुटुंबीयांच्या अर्जानंतर पाच तासांच्या पॅरोलचा आदेश दिला.
 
दास यांच्या आई संध्या राणी धर यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी चिन्मय कृष्ण दास यांना तुरुंगातून पाच तासांसाठी बाहेर सोडण्यात आले. पॅरोलची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा चिटगाव केंद्रीय कारागृहात परत नेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. (Chinmoy Krishna Das Parole)
 
आईची शेवटची इच्छा अपूर्ण
 
संध्या राणी धर यांची तुरुंगात असलेल्या मुलाला भेटण्याची शेवटची इच्छा होती. मात्र, आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी पॅरोल देण्याची कायदेशीर तरतूद नसल्याचे सांगत प्रशासनाने कुटुंबीयांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांच्या आईचे निधन झाले आणि अंत्यसंस्कारासाठी चिन्मय कृष्ण दास यांना पाच तासांची पॅरोल मंजूर करण्यात आली.(Chinmoy Krishna Das Parole)
 
संध्या राणी धर यांच्यावर काही काळ रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना चिटगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आपल्या मुलाचा आश्रम असलेल्या श्री श्री पुंडरीक धाम येथेच आयुष्याचे अखेरचे दिवस घालवण्याची त्यांची इच्छा होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यांचे निधन हथजारी येथील पुंडरीक धाम परिसरात झाले. (Chinmoy Krishna Das Parole)
 
अर्जानंतर पॅरोल मंजूर
 
कुटुंबीयांनी बुधवारी चिटगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे चिन्मय कृष्ण दास यांना आजारी आईला भेटण्यासाठी सशर्त पॅरोल देण्याची विनंती केली होती. मात्र, आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी पॅरोल देण्याची तरतूद नसल्याचे प्रशासनाने सांगितले. (Chinmoy Krishna Das Parole)
 
आईच्या निधनानंतर दास यांच्या भावाने वैद्यकीय प्रमाणपत्रासह पुन्हा अर्ज केला. त्यानंतर कुटुंबीयांच्या विनंतीवरून पॅरोल मंजूर करण्यात आली. अंत्यसंस्कारासाठी हथजारी येथे जाऊन पाच तासांच्या आत परतण्याचे निर्देश देण्यात आले. (Chinmoy Krishna Das Parole)
 
नोव्हेंबर २०२४ पासून तुरुंगात
 
चिन्मय कृष्ण दास यांना नोव्हेंबर २०२४ मध्ये राष्ट्रीय ध्वजाचा अवमान आणि देशद्रोहाच्या आरोपांनंतर अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर बांगलादेशात निदर्शने आणि सांप्रदायिक तणाव निर्माण झाला होता. तेव्हापासून ते तुरुंगात असून, त्यांच्या जामिनाचा अर्ज अद्याप मंजूर झालेला नसल्याचे वृत्त आहे. (Chinmoy Krishna Das Parole)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर