_202609101251351905_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुंबई - Rani Mukerjiमहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या आयोजनाने झालेल्या या सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल अभिनेत्री डॉ.राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले..यावेळी माझ्यासाठी महाराष्ट्र सगळ्यात जवळचं आहे कारण ही माझी जन्मभूमी आणि कार्मभूी आहे आणि याचा मला अभिमान असल्याचं डॉ. राणी मुखर्जी म्हणाली.
राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मान झालेल्या डॉ. राणी मुखर्जी म्हणाल्या,
माझ्यासाठी महाराष्ट्र सगळ्यात जवळचं आहे कारण ही माझी जन्मभूमी आणि कार्मभूी आहे आणि याचा मला अभिमान आहे..मी जास्त महिलाप्रधान भूमिका केल्या.. हि माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे..सिनेमा माझ्यासाठी इमोशन आहे.. माझ्या कारकिर्दीत मी अनेक भूमिका केल्या.. त्यासाठी मला अनेक पुरस्कार मिळाले.. पण हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे कारण महाराष्ट्र म्हणजे माझ्या घरातल्या लोकांनी केलेला हा सन्मान आहे..मी हा पुरस्कार मुंबई आणि महाराष्ट्राला समर्पित करते..Rani Mukerji
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राणी मुखर्जी यांचे कौतुक केले. त्यांनी साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. पण माझी त्यांच्याबद्दल तक्रार आहे. त्या फक्त खंड्याळ्याचं प्रमोशन करतात त्यांनी महाराष्ट्रातील इतर पर्यटन स्थळांनाही भेट द्यावी, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणीची फिरकी घेतली.Rani Mukerji