मुंबई - Prasad Oakमहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या आयोजनाने झालेल्या या सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रसाद ओक यांचे कौतुक केले. फडणवीस म्हणाले कलाकार म्हणून भूमिकेत जीव ओतनं प्रसाद ओक यांच्याकडून शिकावं. प्रत्येक भूमिकेत ते उत्तम काम करतात. त्यांच्याकडून अजून अशाच उत्तम कामांची अपेक्षा आहे.
अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यावेळी म्हणाले कि,शांताराम बापू यांच्या 125 व्या शताब्दी वर्षात 125व्या चित्रपटाच्या उंबरठ्यावर उभा असताना हा सन्मान मिळणं माझं भाग्य आहे..माझ्या सगळ्या दिग्दर्शकांना हा पुरस्कार समर्पित करतो..Prasad Oak
या सोहळ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘खंजिरीचे बोल’ या चरित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून या चरित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.Prasad Oak