गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; स्पर्धा परीक्षांसाठी केंद्र सरकार देणार ’मोफत ऑनलाईन कोचिंग’

    10-Sep-2026   
 
Free Online Coaching Scheme
 
नवी दिल्ली (Free Online Coaching Scheme) : देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर आणि सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न आता पैशांअभावी अपूर्ण राहणार नाही . आयआयटी-जेईई, नीट आणि यूपीएससी यांसारख्या कठीण स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच देशव्यापी ’मोफत ऑनलाईन कोचिंग’ योजना सुरू करणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली नवी दिल्लीत आयोजित एका शैक्षणिक परिषदेत संवाद साधताना पंतप्रधानांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचे सूतोवाच केले. देशातील सर्वोत्तम शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ आता थेट ग्रामीण आणि दुर्गम भागातील सामान्य विद्यार्थ्यालाही घरबसल्या पूर्णपणे मोफत घेता येणार आहे. सध्याच्या काळात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या कोचिंगची फी लाखो रुपयांच्या घरात गेली आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेले हुशार विद्यार्थी गुणवत्ता असूनही मागे पडतात, तर अनेक पालकांना कर्जबाजारी व्हावे लागते. "शिक्षणाचे व्यापारीकरण रोखणे आणि देशातील शेवटच्या घटकांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवणे हे आमच्या सरकारचे ध्येय आहे . पैशांच्या कमतरतेमुळे कोणत्याही विद्यार्थ्याची गुणवत्ता वाया जाणार नाही," असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिला. (Free Online Coaching Scheme)
 
कोणकोणत्या प्रादेशिक भाषांमध्ये मिळणार कोचिंग?
 
नवीन शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून हे कोचिंग केवळ इंग्रजी किंवा हिंदीपुरते मर्यादित न ठेवता, मराठीसह देशातील एकूण १२ ते १५ प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिले जाईल.महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे संकल्पनात्मक शिक्षण शुद्ध मराठी भाषेतून मिळणार आहे. व्हिडिओ लेक्चर्ससोबतच सराव प्रश्नपत्रिका (नोट्स आणि ई-बुक्सही मराठीत विनामूल्य डाउनलोड करता येतील.’एआई’ तंत्रज्ञानाचा वापर: केंद्र सरकारच्या ’भाषिणी’ कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीद्वारे देशातील सर्वोत्तम शिक्षकांचे इंग्रजीतील संवाद विद्यार्थ्यांना मराठी ऑडिओ आणि सबटायटल्ससह रिअल-टाईममध्ये पाहता येतील. (Free Online Coaching Scheme)
 
लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता?
 
योजनेच्या प्राथमिक आराखड्यानुसार, लाभ घेण्यासाठी खालील निकष असण्याची आर्थिक निकष: ही योजना प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी असल्याने, पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक असू शकते. (Free Online Coaching Scheme)
 
शैक्षणिक पात्रता: आयआयटी आणि नीटसाठी ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, तर यूपीएससीसाठी पदवीच्या अंतिम वर्षात असलेले किंवा पदवीधर तरुण पात्र असतील.
 
कागदपत्रे: नोंदणीसाठी आधार कार्ड, शैक्षणिक गुणपत्रिका आणि पालकांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक राहील. (Free Online Coaching Scheme)

ऑनलाईन नोंदणी कधीपासून सुरू होणार?
 
केंद्र सरकारच्या शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून सध्या या राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती केली जात आहे या प्रकल्पाच्या पूर्वतयारीनंतर, आगामी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजेच मार्च किंवा एप्रिल २०२७ पासून अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता आहे. (Free Online Coaching Scheme)





योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर