मुंबई - Devendra Fadnavis मराठी चित्रपट संपूर्ण जगात कलात्मक दृष्ट्या अव्व्ल दर्जाचा आहे.. मराठी रंगभूमी देशातील सर्वोत्कृष्ट रंगभूमी आहे..त्यामुळे आपल्या मराठी चित्रपटांना हक्काची चित्रपटगृह मिळवून देण्यासाठी योजना तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.. महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव करणाऱ्या ६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार,चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील उपस्थित होते..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र चित्रपटगृहे उभारण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. याबाबतचा प्रस्ताव सध्या तयार करण्यात येत असून लवकरच त्याची घोषणा करण्यात येईल. आशय आणि दर्जाच्या बाबतीत मराठी चित्रपटसृष्टीने सातत्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून प्रेक्षकांकडूनही मराठी चित्रपटांना कायमच मोठा प्रतिसाद मिळतो.”Devendra Fadnavis
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या आयोजनाने झालेल्या या सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला..तसेच ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते या सोहळ्यास येऊ शकले नाहीत.. त्यांच्यावतीने हेलन यांनी हा सन्मान स्वीकारला..तर अभिनेत्री डॉ.राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले..Devendra Fadnavis
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि, पंडितजींचं कुटुंब असंख्य अडचणीतून मात करत पुढे आलं. लतादीदी, आशा ताई असतानाही त्यांनी स्वतःची छाप सोडली. लता दीदींनी गायलेला मोगरा फुलला पंडितजींनी स्वर्गापर्यंत नेऊन दाखवला.. त्यामुळे योग्य व्यक्तीला हा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे..Devendra Fadnavis
फडणवीस पुढे म्हणाले कि सलीम साहेबांनी आजवर अनेक अजरामर कथानक दिलीत. लेखक हिरो घडवतो हे त्यांनी दाखवून दिलं.. शोलेसारखा यादगार चित्रपट दिला.. शोलेचे किमान 50 संवाद माझे पाठ आहेत.. तर कलाकार म्हणून भूमिकेत जीव ओतनं प्रसाद ओक यांच्याकडून शिकावं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओक यांच कौतुक केलं.Devendra Fadnavis
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारातील सर्व पुरस्कारप्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या चित्रपटांना व्यापक प्रेक्षकवर्ग मिळवून देण्यासाठी तसेच राज्यातील चित्रपट निर्मितीचे परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. एन. डी. स्टुडिओ, फिल्मसिटी, कोल्हापूर येथे चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी उपलब्ध सुविधा तसेच रामटेक येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या सुविधांच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीसाठी उपलब्ध संधी आणि पायाभूत सुविधा सातत्याने वाढविण्यात येत आहेत.”
ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आपला जीवनगौरव पुरस्काराने झालेला सन्मान बघून लता दिदी आणि आशाताई भारावून गेल्या असत्या, असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्यात..Devendra Fadnavis
चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मान झालेले अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यावेळी म्हणाले कि,शांताराम बापू यांच्या 125 व्या शताब्दी वर्षात 125व्या चित्रपटाच्या उंबरठ्यावर उभा असताना हा सन्मान मिळणं माझं भाग्य आहे..माझ्या सगळ्या दिग्दर्शकांना हा पुरस्कार समर्पित करतो..Devendra Fadnavis
राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मान झालेल्या डॉ. राणी मुखर्जी म्हणाल्या,
माझ्यासाठी महाराष्ट्र सगळ्यात जवळचं आहे कारण ही माझी जन्मभूमी आणि कार्मभूी आहे आणि याचा मला अभिमान आहे..मी जास्त महिलाप्रधान भूमिका केल्या.. हि माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे..सिनेमा माझ्यासाठी इमोशन आहे.. माझ्या कारकिर्दीत मी अनेक भूमिका केल्या.. त्यासाठी मला अनेक पुरस्कार मिळाले.. पण हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे कारण महाराष्ट्र म्हणजे माझ्या घरातल्या लोकांनी केलेला हा सन्मान आहे..मी हा पुरस्कार मुंबई आणि महाराष्ट्राला समर्पित करते..Devendra Fadnavis