नवी मुंबईतील विकासकामांचा वनमंत्री गणेश नाईकांकडून झंझावाती पाहणी दौरा...

    09-Aug-2026
Ganesh Naik Navi Mumbai Development
 
ठाणे : (Ganesh Naik Navi Mumbai Development) वनमंत्री गणेश नाईक यांनी शुक्रवारी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध महत्त्वपूर्ण विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यामध्ये ऐरोली नाट्यगृह, छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा स्मारक, ऐरोली-काटई पूल परिसर तसेच तुर्भे-खारघर लिंक रोड (रस्ता व बोगदा प्रकल्प) यांचा समावेश होता.
 
ऐरोली नाट्यगृहाच्या कामाची सद्यस्थिती, कामाचा वेग, गुणवत्ता आणि उर्वरित कामाचे नियोजन याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कामात विलंब होऊ नये तसेच गुणवत्ता व सुरक्षिततेच्या निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.(Ganesh Naik Navi Mumbai Development)
 
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या कामाची पाहणी करण्यात आली. स्मारक परिसराचे सुशोभीकरण, स्वच्छता आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा यावर विशेष भर देत काम निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.(Ganesh Naik Navi Mumbai Development)
 
 
ऐरोली-काटई नाका परिसरातील वाहतूक व्यवस्था, रस्त्यांच्या सुधारणा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला. तसेच तुर्भे-खारघर लिंक रोड प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती घेऊन काम उच्च दर्जाचे आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.(Ganesh Naik Navi Mumbai Development)
 
या प्रकल्पामुळे तुर्भे, खारघर आणि नवी मुंबईतील विविध भागांमधील प्रवास अधिक जलद व सुलभ होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नागरिकांना आधुनिक, दर्जेदार आणि सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.(Ganesh Naik Navi Mumbai Development)
 
याप्रसंगी वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमवेत महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, स्थायी समिती सभापती अशोक पाटील तसेच विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक आणि शहर अभियंता शिरीष आरदवाड व एमएमआरडीए, सिडको व महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.(Ganesh Naik Navi Mumbai Development)
 
 




संबंधित मजकूर