इस्लामाबादमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या वरिष्ठ कमांडरचा अचानक मृत्यू; आजार की अन्य काही? मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

    09-Aug-2026

 LeT Commander Qari Sayeed Abdul Aziz Death

इस्लामाबाद (LeT Commander Qari Sayeed Abdul Aziz Death) :
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या (LeT) एका वरिष्ठ कमांडरचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत कमांडरची ओळख कारी सईद अब्दुल अजीज अशी करण्यात आली आहे. नमाज अदा करण्यासाठी तो कूबा मशिदीत पोहोचला होता. मात्र, मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळच अचानक कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, कारी सईद मशिदीत येण्यापूर्वी एका अज्ञात ठिकाणी जेवण करून आला होता. त्यानंतर तो कूबा मशिदीत पोहोचला आणि नमाजपूर्व वजू केले. वजू केल्यानंतर तो बॅग घेऊन मुख्य नमाजाच्या ठिकाणी जात होता. याचवेळी तो बसून बूट काढत असताना अचानक जमिनीवर कोसळला. (LeT Commander Qari Sayeed Abdul Aziz Death)
 
घटनेनंतर मशिदीत उपस्थित असलेल्या लष्करशी संबंधित व्यक्तींनी त्याला तातडीने उचलले. त्याला दुसऱ्या ठिकाणी नेऊन CPR देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बराच वेळ प्रयत्न करूनही त्याला शुद्ध आली नाही. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. अचानक आलेली वैद्यकीय समस्या, आजार किंवा अन्य कारण यापैकी नेमके काय कारण होते, हे स्पष्ट झालेले नाही. (LeT Commander Qari Sayeed Abdul Aziz Death)
 
 
 
मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची जबाबदारी
 
कारी सईद अब्दुल अजीज हा लष्कर-ए-तैयबाच्या ‘शोबा-ए-वारसा-ए-शुहदा’ या विभागाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येते. भारतातील चकमकींमध्ये ठार झालेल्या लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क ठेवणे आणि त्यांना आर्थिक मदत देण्याचे काम या विभागाकडून केले जात असल्याचा दावा आहे. या विभागामार्फत मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच मासिक पेन्शन दिली जात असल्याचेही सांगितले जाते. (LeT Commander Qari Sayeed Abdul Aziz Death)
 
३० हून अधिक लष्कर सदस्यांच्या मृत्यूचा दावा
 
कारी सईदच्या मृत्यूची घटना अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा लष्करशी संबंधित कमांडर रिझवान हनीफ याचा एक व्हिडिओ चर्चेत आला होता. गेल्या तीन ते चार वर्षांत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये संघटनेचे ३० हून अधिक सदस्य अज्ञात हल्लेखोरांकडून ठार झाल्याचा दावा त्याने केला होता. (LeT Commander Qari Sayeed Abdul Aziz Death)
 
या घटनांसाठी हनीफने भारतीय गुप्तचर यंत्रणांवर आरोप केले. मात्र, या आरोपांना स्वतंत्रपणे पुष्टी देणारे ठोस आणि पुरावे समोर आलेले नाहीत.
 
दरम्यान, कारी सईद अब्दुल अजीजच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, अधिकृत वैद्यकीय अहवाल किंवा तपासातूनच या घटनेमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. (LeT Commander Qari Sayeed Abdul Aziz Death)




संबंधित मजकूर