मुंबई (Republican Party National Executive Meeting):रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी ची बैठक येत्या दिनांक 10 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत आयोजीत करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे .या बैठकीत राष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान सह विविध राज्यातील रिपब्लिकन पक्षाच्या पक्षसंघटनेच्या कामगिरीचा आढावा या बठकीत घेण्यात येणार आहे. (Republican Party National Executive Meeting)
या बैठकीत रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले पक्षाच्या कामगिरीचा आढाणा घेणार आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य, पदाधिकारी, सर्व राज्यांचे अध्यक्ष आणि राज्य सेक्रेटरी, सर्व राज्यांचे कार्याध्यक्ष आणि प्रभारी, सर्व राज्यांचे युवक आघाडी आणि महिला आघाडीच्या पदाधिका-यांना या बैठकीत निमंत्रीत करण्यात आले आहे. (Republican Party National Executive Meeting)
रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीचे निमंत्रण रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, संघटन सचिव बी.के. बर्वे यांनी राज्य स्तरावरील सर्व पदाधिका-यांना दिले असून या बैठकीत वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे. आगामी काळात रिपब्लिकन पक्षाला निवडणुक आयोगाची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची देशभरात वाटचाल सुरु आहे. याबाबत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले हे या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत पदाधिका-यांना निर्देश देणार असल्याने ही राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक अत्यंत महत्वाची ठरलेली आहे. य महत्वपूर्ण बैठकीत देशभरातील रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहतील अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आलेली आहे. (Republican Party National Executive Meeting)
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची 10 वर्षाची कारकिर्द यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून 10 वर्ष पूर्ण केल्याबद्दल ना.रामदास आठवले यांचा देशभरामध्ये सत्कार आणि देशभरातुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे. या पार्श्वभुमीवर ही रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक महत्वाची ठरलेली आहे. अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आलेली आहे.(Republican Party National Executive Meeting)