कोकणवासीयांसाठी दिलासादायक बातमी; सीएसएमटी-मडगाव दरम्यान ४ विशेष गाड्या

गणेशोत्सवपूर्वी आणि स्वातंत्र्यदिनाच्या दरम्यान सलग सुट्या

CSMT Madgaon Special Trains
 
मुंबई : (CSMT Madgaon Special Trains) स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई आणि मडगाव दरम्यान चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या आणि परतणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.(CSMT Madgaon Special Trains)
 
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१०२९ विशेष गाडी १३ ऑगस्ट (गुरुवार) आणि १५ ऑगस्ट (शनिवार) रोजी सीएसएमटी येथून रात्री १२.२५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०१०३० विशेष गाडी १३ आणि १५ ऑगस्ट रोजी मडगाव येथून सायंकाळी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.(CSMT Madgaon Special Trains)
 
या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी यांसह महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी गाडीत १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ५ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅन (द्वितीय आसनासह) असे एकूण विविध श्रेणींचे डबे असतील.(CSMT Madgaon Special Trains)
 
गाडी क्रमांक ०१०२९ चे आरक्षण ८ ऑगस्टपासून सर्व पीआरएस आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. अनारक्षित डब्यांसाठी तिकीट यूटीएस प्रणाली तसेच रेलवन ॲपद्वारे उपलब्ध असेल. मध्य रेल्वेने प्रवाशांना गर्दी टाळण्यासाठी आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन केले असून, गाड्यांच्या वेळापत्रकाची सविस्तर माहिती एनटीईएस ॲप किंवा भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.(CSMT Madgaon Special Trains)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर