मुंबई : (Neha Bora Ink Attack) झारखंडच्या रांची येथे सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनात सहभागी होण्यासाठी ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (एआयएसए) राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा गेल्या होत्या. मात्र तिथे त्यांना तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर त्यांच्यावर शाईफेक झाल्यचेही निदर्शनास आले आहे.
जेपीएससी-जेएसएससी परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात त्या आपल्या सहकाऱ्यांसह झारखंड विधानसभेकडे मोर्चा नेत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली. पोलिसांनी शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.(Neha Bora Ink Attack)
दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलन आणि उपोषणानंतर नेहा बोरा देशभर चर्चेत आल्या होत्या. एआयएसएच्या नेत्या म्हणून झारखंडमधील आंदोलनास पाठींबा देण्यासाठी त्या आल्या होत्या. मात्र, त्यांच्या या पाठिंब्याबाबत काही स्पर्धा परीक्षार्थींनी नाराजी व्यक्त केली व त्यांच्या उपस्थितीला विरोध दर्शविला.(Neha Bora Ink Attack)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक