गतिमान भूसंपादनातून औद्योगिक विकासाला गती द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    07-Aug-2026
 
CM of Maharashtra  
 
मुंबई : (DevendraFadnavis) राज्यातील नवीन औद्योगिक वसाहतींचा वेगाने विस्तार होत असून उद्योगांना आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 'वर्षा' निवासस्थानी एमआयडीसीअंतर्गत विविध प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा घेताना त्यांनी अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम जमीन वाटपावर भर दिला.
 
मुख्यमंत्री म्हणाले की, 'मिलाप' ऑनलाइन प्रणालीमुळे औद्योगिक भूखंड वाटप प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक झाली आहे. १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत राज्यात १,१८३ औद्योगिक भूखंडांचे वाटप करण्यात आले असून त्यातून ५,५०२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. (DevendraFadnavis)
 
 
 
राज्यात सध्या ६६,३४३ एकर जमिनीचे संपादन सुरू असून गडचिरोली, नागपूर, पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, ठाणे, चंद्रपूर, वर्धा आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध जिल्ह्यांत प्रक्रिया सुरू आहे. तसेच ९७ सामंजस्य करारांअंतर्गत सुमारे ७५,२३४ एकर जमिनीची मागणी असून त्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.(DevendraFadnavis)
 
वनपरवानग्या व प्रशासकीय मंजुरींमधील विलंब कमी करून उद्योगांना जमीन वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश देतानाच, भूखंड विकासासाठी निश्चित कालमर्यादा, विलंब झाल्यास दंड आणि आवश्यकतेनुसार भूखंड पुन्हा ताब्यात घेण्याची तरतूद करण्याचाही विचार करण्यास त्यांनी सांगितले. तसेच देश-विदेशातील सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करून नवीन जमीन वाटप धोरण तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. (DevendraFadnavis)
 
 




संबंधित मजकूर