संभल हिंसाचाराच्या अहवालातून देशद्रोही शक्तींचा पर्दाफाश!

दोषींवर कठोर कारवाईची विहिंपची मागणी

    06-Aug-2026   

Sambhal Violence Report
 
 
मुंबई (Sambhal Violence Report) : विश्व हिंदू परिषदेने उत्तर प्रदेश विधानसभेत सादर करण्यात आलेल्या संभल हिंसाचाराशी संबंधित न्यायिक आयोगाच्या अहवालाचे स्वागत केले असून, हा सत्याचा विजय असल्याचे म्हटले आहे. विहिंपचे केंद्रीय संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी गुरुवारी याबाबत एक निवेदन जारी करत हा अहवाल भारताची एकता, अखंडता आणि घटनात्मक व्यवस्था नष्ट करण्यावर तुटून पडलेल्या देशद्रोही शक्तींचा बुरखा फाडतो.(Sambhal Violence Report)
 
त्यांनी सांगितले की, आयोगाने हे स्पष्टपणे सिद्ध केले आहे की शाही जामा मशिदीच्या न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या सर्वेक्षणाला रोखण्यासाठी झालेला हिंसाचार ही कोणतीही अचानक घडलेली घटना नव्हती, तर एक सुव्यवस्थित आणि पूर्व नियोजित कट होता. समाजवादी पक्षाचे खासदार जिया-उर-रहमान बर्क, स्थानिक आमदार इक्बाल मेमूद यांचे पुत्र सुहेल इक्बाल, जामा मशीद व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी खोट्या अफवा पसरवून, जमावाला भडकावून आणि हिंसाचार घडवून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिले.(Sambhal Violence Report)
 
दगडफेक, जाळपोळ, गोळीबार आणि पोलिसांवरील हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला तसेच २८ पोलीस कर्मचारी जखमी झाले. अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, मृतांना लागलेल्या गोळ्या पोलिसांच्या नव्हत्या; हा या कटकारस्थान रचणाऱ्यांच्या हिंसाचाराचाच परिणाम होता. डॉ. जैन यांनी सांगितले की, ही घटना एकमेव नाही. ही अशा शक्तींच्या मानसिकतेला उघड करते ज्या न्यायालयाच्या आदेशांचा अनादर करण्यास, हिंदू समाजाला दहशतीखाली ठेवण्यास आणि जातीय भेद निर्माण करण्यास कोणतीही कसर सोडत नाहीत. अशा नराधमांमुळेच संभलला ‘मिनी पाकिस्तान’ म्हटले जायचे.(Sambhal Violence Report)
 
त्यांनी सांगितले की संभलसारख्या भागांत सातत्याने होत असलेले जनसांख्यिकीय बदल आणि वारंवार घडणारा हिंसाचार हा या घटकांच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे. जर भविष्यात कधी अशा देशविघातक शक्ती सत्तेत आल्या न्यायालयाच्या आदेशांना उघडपणे आव्हान दिले जाईल. हिंदू समाजाला भीती आणि दहशतीखाली ठेवले जाईल. पोलीस आणि प्रशासनाला कमकुवत करून कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त केली जाईल. देशाची एकता आणि अखंडता वारंवार मोडून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. जातीय हिंसाचाराला राजकीय हत्यार बनवून देशाला अस्थिर करण्याचे प्रयत्न तीव्र केले जातील.(Sambhal Violence Report)
 
विश्व हिंदू परिषदेने मागणी केली आहे की,
 
  • अहवालात नाव असलेल्या सर्व कटकारस्थान रचणाऱ्यांवर आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या राजकारण्यांवर त्वरित, कठोर आणि निर्णायक कायदेशीर कारवाई केली जावी.
  • या देशद्रोही घटकांना अशी शिक्षा दिली जावी जी भविष्यात कोणालाही असे धाडस करण्यापासून रोखेल.
  • संभलसह राज्यातील संवेदनशील भागांत हिंदू समाजाची सुरक्षा, धार्मिक स्थळांचे संरक्षण आणि कायदा व सुव्यवस्था आणखी मजबूत केली जावी.
  • पोलीस आणि प्रशासनाच्या ज्या अधिकाऱ्यांनी हा कट आणखी मोठ्या स्वरूपात पसरण्यापासून रोखला, त्यांचे कौतुक केले जावे.
  • उत्तर प्रदेश सरकार या अहवालाची अंमलबजावणी करत दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्यात कोणतीही कसूर सोडणार नाही, अशी आम्ही अपेक्षा करतो. देशाची एकता आणि हिंदू समाजाची सुरक्षा हा कोणत्याही तडजोडीचा विषय असू शकत नाही.




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर