त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
भाजप राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभा खासदार विनोद तावडे यांनी राज्यसभेत मांडला संवेदनशील विषय; नोटो (NOTTO) अंतर्गत स्किन बँक्स, कोल्ड-चेन नेटवर्क आणि जनजागृती वाढविण्याचे केंद्र सरकारला आवाहन.
नवी दिल्ली : (Vinod Tawde BJP MP) गंभीररीत्या भाजलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी देशात त्वचादान आणि 'स्किन बँकिंग'ची व्यवस्था अधिक मजबूत करण्याची अत्यंत गरज आहे. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार विनोद तावडे यांनी गुरुवारी राज्यसभेत या महत्त्वाच्या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधले.
राज्यसभेत बोलताना खासदार विनोद तावडे म्हणाले की, गंभीर भाजलेल्या रुग्णांसाठी दान केलेली त्वचा ही एखाद्या संरक्षकासारखे काम करते. यामुळे रुग्णाच्या शरीराला संसर्ग होत नाही आणि शरीरातील पाणी कमी होत नाही. कायमस्वरूपी उपचार होईपर्यंत ही त्वचा रुग्णाचा जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. (Vinod Tawde BJP MP)
सरकारने 'NOTTO' (राष्ट्रीय अवयव आणि उती प्रत्यारोपण संघटना) च्या माध्यमातून अवयवदानासाठी चांगले काम केले आहे. मात्र, त्वचादानाबाबत अजूनही समाजात पुरेशी जनजागृती झालेली नाही. जर आपण स्किन बँक्सची संख्या वाढवली आणि संपूर्ण देशात त्वचा संकलनाची उत्तम व्यवस्था केली, तर हजारो रुग्णांना वेळेवर मदत मिळू शकेल, असे त्यांनी नमूद केले. (Vinod Tawde BJP MP)
#WATCH | Rajya Sabha MP and BJP National General Secretary Vinod Tawde today highlighted the urgent need to strengthen skin donation and skin banking systems to improve treatment and outcomes for individuals suffering from severe burn injuries.
त्वचादानाशी जोडलेली महत्त्वाची बाब म्हणजे, मृत्यूनंतर ६ तासांच्या आत त्वचादान करता येते. यासाठी रक्त गट जुळण्याची गरज नसते. फक्त त्वचेचा वरचा थर काढला जातो, ज्यामुळे मृतदेहाचे कोणतेही विद्रूपीकरण होत नाही. योग्य पद्धतीने जतन केलेली त्वचा ५ वर्षांपर्यंत वापरता येते. (Vinod Tawde BJP MP)
आपल्या भावना व्यक्त करताना तावडे म्हणाले की, "माझ्या आईच्या निधनानंतर हा विषय माझ्यासाठी खूप वैयक्तिक बनला. म्हणूनच मी सरकारला विनंती करतो की, NOTTO अंतर्गत त्वचादानासाठी एक मजबूत राष्ट्रीय व्यवस्था उभारली जावी. आधुनिक स्किन बँक्स उभारणे, जलद वाहतूक व्यवस्था निर्माण करणे आणि देशभरात मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवणे गरजेचे आहे, जेणेकरून कोणत्याही गरजू रुग्णाचा उपचारांअभावी मृत्यू होणार नाही. (Vinod Tawde BJP MP)