मुंबईत अनधिकृत टर्फवर येणार शिस्त; भाजपचे ताजिंदरसिंग तिवाना यांच्या पुढाकाराने 'स्मार्ट टर्फ धोरणा'चा प्रस्ताव

"खेलो मुंबई" ॲपद्वारे बुकिंग पारदर्शक होणार; विषारी रबर कणांवर बंदीसह नागरिकांच्या आरोग्याला मिळणार प्राधान्य

    06-Aug-2026
Unauthorized turf 
 
मुंबई : (Mumbai Smart Turf Policy) मुंबई आणि उपनगरांमध्ये खेळाडू आणि क्रीडाप्रेमींसाठी हक्काचे ठिकाण बनलेल्या कृत्रिम टर्फ मैदानांना आता नियमांची योग्य चौकट मिळणार आहे. शहरात अनियंत्रितपणे वाढणाऱ्या टर्फमुळे स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास दूर करत, खेळाडूंना अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने तातडीने सर्वसमावेशक 'अॅडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण' लागू करावे, अशी सकारात्मक व महत्त्वपूर्ण मागणी भाजप नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
 
मुंबईत मोकळ्या जागांची टंचाई लक्षात घेता १,५०० हून अधिक टर्फ खेळाडूंसाठी दिलासा ठरले आहेत. मात्र, स्पष्ट नियमावलीअभावी उद्भवणारे वाद मिटवून खेळाचा दर्जा उंचावणे आणि नागरिकांची शांतता जपणे, असा दुहेरी उद्देश या प्रस्तावित धोरणामागे आहे. (Mumbai Smart Turf Policy)
 
'खेलो मुंबई' ॲपद्वारे डिजिटल पारदर्शकता:
 
महापालिकेच्या अधिकृत 'खेलो मुंबई' मोबाईल ॲपद्वारे सर्व टर्फची नोंदणी, ऑनलाइन आरक्षण आणि परवानग्या दिल्या जातील. यामुळे रोख व्यवहारांना आळा बसून संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि सुलभ होईल. (Mumbai Smart Turf Policy)
 
पर्यावरणपूरक व सुरक्षित साहित्याचा वापर:
 
टर्फमध्ये वापरल्या जाणाऱ्या निकृष्ट व विषारी रबर कणांवर बंदी घालून केवळ आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर अनिवार्य करण्याची शिफारस करण्यात आली आहे. (Mumbai Smart Turf Policy)
 
सुरक्षा व नियमन:
 
निवासी भागातील टर्फवर संरक्षणात्मक 'रूफ नेट' बसवणे, तसेच ध्वनीप्रदूषण, फ्लडलाइट्सचा प्रकाश, वाहतूक नियोजन आणि अग्निसुरक्षेबाबत नियमित तपासणी करून शिस्तबद्ध संचालन सुनिश्चित केले जाईल. (Mumbai Smart Turf Policy)
 
​खेळाचा आनंद आणि नागरिकांचे आरोग्य यांचा सुरेख मेळ
 
​खेळाडूंना खेळण्यासाठी आधुनिक सुविधा मिळतानाच, रात्रीच्या वेळी स्थानिक रहिवाशांची विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची शांतता भंग पावणार नाही, असा सुवर्णमध्य या धोरणातून काढण्यात आला आहे. टर्फवर थेट बंदी घालण्याऐवजी सर्व घटकांचे हित जपणारे आधुनिक धोरण आणण्याचा हा प्रयत्न नागरिकांकडूनही स्वागतार्ह ठरत आहे. (Mumbai Smart Turf Policy)
 
या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्तांकडे तातडीने 'कृती अहवाल' सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे. पालिकेच्या या सकारात्मक पावलामुळे मुंबईतील क्रीडा संस्कृतीला अधिक सुरक्षित, आधुनिक आणि शिस्तबद्ध स्वरूप प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (Mumbai Smart Turf Policy)
 
"मुंबईला अधिक क्रीडाप्रेमी आणि समृद्ध शहर बनवण्यासाठी कृत्रिम टर्फवर बंदी घालण्याऐवजी स्पष्ट, आधुनिक आणि संतुलित नियमावली आवश्यक आहे. खेळाडू, नागरिक आणि महानगरपालिका या सर्वांच्याच हिताचे संरक्षण करणारी 'अॅडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ पॉलिसी' ही काळाची गरज आहे."
ताजिंदरसिंग तिवाना, नगरसेवक व स्थायी समिती सदस्य 
 




संबंधित मजकूर