मेहबूबा मुफ्तींकडून तिरंग्याचा अपमान! आंदोलनाच्या नावाखाली ध्वज धरला उलटा

आंदोलनाच्या नावाखाली ध्वज धरला उलटा

    06-Aug-2026   
Mehbooba Mufti
 
मुंबई : (Mehbooba Mufti Tricolour Controversy) जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती या अनुच्छेद ३७० हटविण्याच्या निर्णयाला सातत्याने विरोध करत आल्या आहेत. त्या दरवर्षी ५ ऑगस्ट हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळत आंदोलन करतात. यावर्षीही श्रीनगरमधील पक्ष कार्यालयाबाहेर आयोजित निदर्शनांदरम्यान त्यांनी अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान त्या हातात तिरंगा ध्वज घेऊन उभ्या असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये तिरंगा उलटा धरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावरून त्यांच्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
 
मेहबूबा मुफ्ती यांच्यावर यापूर्वीही भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राइकबाबत केलेली वक्तव्ये, विविध राष्ट्रीय मुद्द्यांवरील भूमिका आणि अनुच्छेद ३७० संदर्भातील भूमिकेमुळे टीका होत आली आहे. तिरंगा उलटा धरल्याच्या या व्हिडिओनंतर त्यांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. दि. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या निर्णयाचे देशभरात अनेकांनी स्वागत केले, तर काही राजकीय पक्ष आणि नेत्यांनी त्याला विरोध दर्शविला. त्या वेळी मेहबूबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला आणि इतर काही नेत्यांनीही या निर्णयाविरोधात भूमिका घेतली होती. (Mehbooba Mufti Tricolour Controversy)
 
यावर्षीच्या आंदोलनादरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे मेहबूबा मुफ्ती पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी आल्या असून, तिरंगा उलटा धरल्याच्या आरोपावरून सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. (Mehbooba Mufti Tricolour Controversy)
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर