सीजेपीकडून सप्टेंबरमध्ये 'क्या बोलती पब्लिक' अभियानाची घोषणा

    06-Aug-2026

मुंबई: (Kya Bolti Public National Campaign September) देशात सुशिक्षित बेरोजगारांपैकी ८० टक्के लोकांकडे पदव्या आहेत. लहानपणापासून मेहनत करून डिग्री घेणाऱ्या तरुणांना आता 'आम्ही शिकून काही चूक केली का?' असा प्रश्न पडत आहे, कारण ज्यांनी कधी फॉर्मल डिग्री घेतली नाही ते लोक सरकार चालवत आहेत, अशा शब्दांत 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दिपके यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आगामी काळात बेरोजगारी हा राजकीय आणि निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनवण्याचा इशाराही त्यांनी दिला. (Kya Bolti Public National Campaign September)

'क्या बोलती पब्लिक' राष्ट्रीय अभियान

सध्याचे राजकीय पक्ष जनतेपासून पूर्णपणे 'डिस्कनेक्ट' झाले असल्याचा आरोप करत दिपके यांनी अभियानाची घोषणा केली. कॉकरोच जनता पार्टी येत्या सप्टेंबर महिन्यात 'क्या बोलती पब्लिक' हे राष्ट्रीय अभियान सुरू करणार आहे. देशभरात दौरा करून लोकांच्या समस्या, अपेक्षा आणि त्यांच्या भावना प्रत्यक्ष समजून घेणे, कारण सध्या लोकांचे ऐकून घेण्यास कोणीही तयार नाही. (Kya Bolti Public National Campaign September)

देशातील शिक्षण व्यवस्थेवर बोलताना ते म्हणाले, पहिली-दुसरीच्या मुलांसाठी वार्षिक फी १ ते १.५ लाख रुपये झाली असून प्रायव्हेट शाळांचे डोनेशन आणि कोचिंग क्लासेसमुळे पालकांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. सरकारला फक्त 'हिंदू-मुसलमान' हा एकच मुद्दा दिसतो. मात्र बेरोजगारी, बिकट आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाचा उडालेला बोगस कारभार यावर कोणीही बोलायला तयार नाही. (Kya Bolti Public National Campaign September)






संबंधित मजकूर