मुंबई पोलीस दलात तब्बल ६.४१ कोटींच्या वेतन घोटाळ्याचा आरोप;

पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Mumbai Police Salary Scam
 
मुंबई : (Mumbai Police Salary Scam) राज्यातील सर्वात मोठ्या पोलीस दलांपैकी एक असलेल्या मुंबई पोलीस दलात तब्बल ६ कोटी ४१ लाख रुपयांच्या कथित वेतन घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस कर्मचारी नसलेल्या व्यक्तींच्या खात्यावर वेतनाची रक्कम वर्ग करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप असून, या प्रकरणी पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मुंबई पोलिसांच्या उत्तर प्रादेशिक विभागाने केलेल्या अंतर्गत चौकशीत वेतन प्रणालीतील संशयास्पद नोंदी, अतिरिक्त वेतन वितरण आणि आर्थिक अनियमितता उघड झाल्याचे समोर आले. प्राथमिक तपासानुसार, या गैरव्यवहारातून सुमारे ६.४१ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
 
हा कथित घोटाळा डिसेंबर २०१९, जानेवारी-फेब्रुवारी २०२० तसेच जून ते सप्टेंबर २०२० या कालावधीत झालेल्या वेतन वितरणाशी संबंधित असल्याची माहिती आहे. २०१९-२०२० मधील वेतन खात्यांची तपासणी करताना ही तफावत उघडकीस आली.(Mumbai Police Salary Scam)
 
या प्रकरणाची नोंद समतानगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशासकीय आणि वेतन विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने हा गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. पोलीस कर्मचारी नसलेल्या व्यक्तींना कर्मचारी दाखवणे, वेतनाच्या बनावट नोंदी तयार करणे आणि सरकारी निधीचा गैरवापर करणे अशा गंभीर आरोपांचा या प्रकरणात समावेश आहे.(Mumbai Police Salary Scam)
 
घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनी उत्तर विभाग-३ चे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या तपासात बोगस कर्मचारी नोंदी नेमक्या कशा तयार करण्यात आल्या, त्यांची पडताळणी कोणी केली आणि या गैरव्यवहाराचा लाभ नेमका कोणाला झाला, याचा सखोल तपास केला जाणार आहे.(Mumbai Police Salary Scam)
 
हा घोटाळा आजचा नाही. 2020 सालचा घोटाळा आहे. त्याच्यावर कारवाई चाललेली आहे आणि सगळ्या ज्यांनी ज्यांनी घोटाळा केला त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई झालेली आहे आणि होते आहे.(Mumbai Police Salary Scam)
 
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर