१ हजार २६३ वेबसाईट्स आणि ४ हजार ९९६ टेलिग्राम चॅनल्सवर सरकारने केली कारवाई! जाणून घ्या काय आहे कारण?

    05-Aug-2026
Movie Piracy Action
 
नवी दिल्ली : (Movie Piracy Action) चित्रपटांची पायरसी करणाऱ्या तब्बल १ हजार २६३ वेबसाईट्स आणि ४ हजार ९९६ टेलिग्राम चॅनल्सवर पायरसीविरोधी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली.
 
खासदार बालाशौरी वल्लभनेनी यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. एकूण वेबसाइट्स आणि टेलिग्राम चॅनेलसह एकूण ७ हजार ३९३ बेकायदेशीर यूआरएल बंद करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत, असे डॉ. मुरुगन यांनी उत्तरात सांगितले.(Movie Piracy Action)
 
चित्रपटांच्या ऑनलाइन पायरसीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सिनेमॅटोग्राफ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा केली. त्यामुळे बेकायदेशीररित्या चित्रपट दाखवणाऱ्या वेबसाईट्सवर कारवाई करण्याचे अधिकार केंद्र सरकारला मिळाले. त्यानुसार या अनधिकृत यूआरएल बंद करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत.(Movie Piracy Action)
 
'पायरसीला वचक बसेल'
 
केंद्र सरकारने उचललेले कारवाईचे हे पाऊल निश्तिच कौतुकास्पद आहे. कारण चित्रपटगृहात चित्रपट असताना किंवा प्रदर्शित होण्याआधीच पायरसीच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे अनेक चित्रपट निर्मात्यांचे आर्थिक नुकसान होते. या कारवाईमुळे पायरसीवर वचक लागेल.
 
प्रीतम पाटील, दिग्दर्शक (Movie Piracy Action)
 
 




संबंधित मजकूर