मुंबई: (SIR voter list 2026) मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय (महाराष्ट्र) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत 'मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' ही मोहीम सुरू आहे. "कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही आणि अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाही," असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे. (SIR voter list 2026)
ज्या नागरिकांची नावे जुन्या यादीत सापडत नाहीत किंवा मॅपिंग झालेले नाही, त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने खालील सोपे नियम व कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे.
१. मॅपिंग न झाल्यास 'या पैकी एक' कागदपत्र तयार ठेवा
स्वतःचे किंवा आई-वडिल/आजी-आजोबा यांचे नाव जुन्या यादीशी जुळत नसल्यास, निवडणूक आयोगाने मान्य केलेले कोणतेही एक कागदपत्र पुरेसे आहे:
ओळख व वयाचा पुरावा: आधार कार्ड, पासपोर्ट, जन्माचा दाखला किंवा १० वी चे शैक्षणिक प्रमाणपत्र.
रहिवास व इतर दाखले: रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, कुटुंब नोंदवही किंवा रेशन कार्ड.
इतर पुरावे: सरकारी/सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी वा निवृत्तीवेतन ओळखपत्र, जमीन/घरवाटप प्रमाणपत्र किंवा १ जुलै १९८७ पूर्वीचे शासकीय ओळखपत्र. (SIR voter list 2026)
२. नाव नोंदणी आणि दुरुस्तीचे ३ महत्त्वाचे नियम
एकाच ठिकाणी नोंदणी: एका व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी असू शकत नाही. त्यामुळे तुम्ही सध्या जिथे राहता, तिथेच अर्ज भरा.
नवीन नाव नोंदणी (फॉर्म ६): यादीत नाव नसलेले नागरिक आणि १८ वर्षे पूर्ण झालेले नवमतदार ऑगस्ट २०२६ मध्ये प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यावर फॉर्म क्र. ६ भरू शकतात.
नाव वगळणे किंवा हरकत (फॉर्म ७): चुकीची नोंद हटवण्यासाठी फॉर्म क्र. ७ भरावा लागेल. (SIR voter list 2026)
३. अंतिम मुदत आणि मोफत सेवा
प्रक्रिया निरंतर सुरू: ऑक्टोबर २०२६ मध्ये अंतिम यादी प्रसिद्ध होईल. मात्र, त्यानंतरही निवडणुकांचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नाव जोडणे किंवा दुरुस्तीची प्रक्रिया सुरूच राहील.
पूर्णपणे मोफत: निवडणूक आयोगाच्या कोणत्याही अर्जासाठी किंवा सेवेसाठी एक रुपयाही शुल्क आकारले जात नाही. (SIR voter list 2026)
नागरिकांसाठी आवाहन
तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे आजच 'Voter Helpline App' किंवा अधिकृत वेबसाईटवर [https://ceoelection.maharashtra.gov.in] जाऊन तपासून घ्या. जर नाव यादीत नसेल, तर घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रे जोडून फॉर्म क्र. ६ त्वरित भरा आणि आपला मतदानाचा हक्क सुरक्षित करा. (SIR voter list 2026)