मुंबई : (Namo Sahakar Taxi) चालक, मालक, सर्व युनियन आणि प्रवासी या सर्वांना विश्वासात घेऊनच नमो सहकार टॅक्सीची भविष्यातील वाटचाल राहील, नमो सहकार टॅक्सी उपक्रमातील प्रत्येक चालक आणि मालक हा या उपक्रमात भागीदार असेल, त्या माध्यमातून चालकांना सन्मान मिळेल, असे प्रतिपादन नमो सहकार टॅक्सीचे प्रणेते प्रवीण दरेकर यांनी केले. मुंबई बँकेत आयोजित चालक, मालक, टॅक्सी युनियनचे पदाधिकारी यांच्या मेळाव्यात बोलत होते.
या मेळाव्याला मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई बँकेचे संचालक विठ्ठलराव भोसले, मनसे नेते संदीप देशपांडे, मुंबई ऑटो रिक्षा मेन्स युनियनचे शशांक राव, महाराष्ट्र अँप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ अँप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत सावर्डेकर यांसह युनियनचे पदाधिकारी, चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Namo Sahakar Taxi)
मेळाव्याला संबोधित करताना दरेकर यांनी सांगितले की, कष्टाने टॅक्सी चालवणाऱ्या चालकांचे आजपर्यंत खूप आर्थिक शोषण झाले आणि दुसऱ्या बाजूला प्रवाशांचीही लूट झाली. हे सर्व थांबवण्यासाठी सहकारातून पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न मी केला आहे. ही टॅक्सी सेवा १०० टक्के सहकारातून चालवली जाईल. नमो सहकार टॅक्सी सेवेकडून अतिशय व्यावसायिक स्वरूपात सेवा चालवत असताना सहकाराचे तत्व पाळून चालकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना देखील राबवल्या जाणार आहेत. आता ही सेवा आपल्या हातात घेऊन जास्तीत जास्त चालक आणि प्रवासी नमो सहकार टॅक्सीशी जोडले जातील, यासाठी प्रयत्न करावा, असेही आवाहन आ. दरेकर यांनी केले.(Namo Sahakar Taxi)
प्रवासी आणि चालक या दोघांनाही समाधान देणारी नमो सहकार टॅक्सी -शशांक राव
या मेळाव्याला संबोधित करताना मुंबई ऑटो रिक्षा मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी असे सांगितले की, मेळाव्यापूर्वी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक दरेकर यांनी घेतली. आज पर्यंत अशा प्रकारची बैठक कोणत्याही आग्रिगेटर कंपनीने घेतली नव्हती, अशा प्रकारची ही पहिली बैठक आहे. सर्व युनियनचे म्हणणे ऐकून घेण्यात आले, आमच्या काही सूचनाही होत्या, त्याही कक्षात घेतल्या गेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी आणि चालक या दोघांनाही समाधान देणारी नमो सहकार टॅक्सी सेवा नक्कीच जनता डोक्यावर घेईल. माझ्या शुभेच्छा आहेत. आम्ही आपल्या बरोबर आहोत. सहकारातील ही टॅक्सी सेवा यशस्वी होईल, असा मला विश्वास आहे.(Namo Sahakar Taxi)
स्वयंपुनर्विकासाप्रमाणे दरेकरांचा नमो सहकार टॅक्सीचा उपक्रमही लोकोपयोगी- संदीप देशपांडे
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, दरेकरांनी आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले. सोसायट्यांच्या इमारतींचा स्वयंपुनर्विकासातून पुनर्विकासाचा त्यांचा उपक्रम कमालीचा यशस्वी झाला. आमचे रिक्षा, टॅक्सी चालकांचे खरोखरच कंपन्यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे शोषण केले जात आहे, त्यांना खऱ्या अर्थाने शोषणातून मुक्ती देणारा आणि प्रवाश्यांची होणारी लूट थांबणारा असा हा उपक्रम आहे. आता चालक आणि प्रवासी या दोघांनीही सहकारातील उपक्रम आपलासा करावा.(Namo Sahakar Taxi)
आम्हाला अभिप्रेत असलेली, आमच्या सर्व युनियनच्या मनातील नमो सहकार टॅक्सी- प्रशांत सावर्डेकर
यापूर्वी आम्ही जशा प्रकारच्या टॅक्सी सेवेचे स्वप्न बघत होतो, तशाच प्रकारचे नमो सहकार टॅक्सीचे मॉडेल आहे, आम्ही सक्रियपणे नमो सहकार टॅक्सीच्या पाठीमागे आहोत. नमो सहकार टॅक्सी सेवेमध्ये सर्व युनियनलचा कामकाजात सहभागी कराल घेण्यासाठी देखील दरेकरांनी सकारात्मकता दाखवली आहे, ही जमेची बाजू आहे, असे राष्ट्रीय अँप बेस टॅक्सी युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत सावर्डेकर यांनी सांगितले. (Namo Sahakar Taxi)
नमो सहकार टॅक्सी मॉडेलला पूर्ण पाठिंबा- रिझवान शेख
मेळाव्यात बोलताना झिरो कमिशन आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ अँप बेस टॅक्सी युनियनचे पदाधिकारी रिझवान शेख यांनी सांगितले की, झिरो कमिशन आणि कॅपसह सर्ज व्यवस्था करणारी, त्या माध्यमातून चालकांना अधिक उत्पन्न मिळवून देणारी आणि प्रवाशांची लूट थांबवणारी रचना नमो सहकार टॅक्सीने केली आहे. चालकांना भागीदारी आणि सन्मान मिळणार आहे. आम्ही आजच्या बैठकीत बाईक टॅक्सीच्या समावेश करू नये, रिक्षाचा लवकरात लवकर समावेश करावा, यासारख्या अनेक सूचना दिल्या आहेत. या मॉडेलला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.(Namo Sahakar Taxi)
बैठक सुरू असताना मुख्यमंत्र्यांचा फोन, टॅक्सी चालकांच्या प्रश्नांवर बैठक घेण्याचा दिला शब्द
मेळाव्यापूर्वी टॅक्सी युनियनच्या प्रमुख नेत्यांची बैठकही दरेकरांनी बोलावली होती, या बैठकीला जवळ जवळ २२ युनियनचे प्रतिनिधी हजर होते. कमिशन, महिलाना संधी, वाहन कर्ज, रेट, सर्जिंग, प्रशिक्षण, आणि कल्याणकारी योजनांवर २ तास मंथन करण्यात आलं. आ. दरेकरांनी प्रतिनिधींच्या मनातील सर्व प्रश्नाचे समाधान केले आणि अशाच प्रकारे सर्वांना विश्वासात घेण्याचे वचन उपस्थितांना दिले. बैठकीत अनेक निर्णयही घेण्यात आले. ही बैठक सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दरेकरांना फोन आला. चालकांच्या प्रश्नांवर बैठक घेण्याची विनंती दरेकर यांनी केली आणि अशी बैठक लवकरच लावू, असा शब्द मुख्यमंत्री यांनी दिला.(Namo Sahakar Taxi)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.