बघा मौलानाच म्हणतायत... 'फॉरेन फंडिंगचा वापर करून देशाचे वातावरण दूषित करण्याचे षड्यंत्र!

सीजेपीदरम्यान झालेल्या आरोपानंतर मौलाना अबरार जमाल यांचे विधान चर्चेत

    04-Aug-2026   
Foreign Funding Conspiracy
 
मुंबई : (Foreign Funding Conspiracy) देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी काही संघटनांना परदेशातून मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्याचा खळबळजनक आरोप जमीयत हिमायतुल इस्लाम या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अबरार जमाल यांनी केला आहे. या परकीय शक्तींच्या प्रभावाखाली काम करणाऱ्या गटांचा हेतू देशातील वातावरण दूषित करणे हाच असून, अशा देशविरोधी शक्तींना नागरिकांनी वेळेत ओळखणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जंतर-मंतरवर झालेल्या सीजेपीच्या आंदोलनादरम्यान झालेल्या फॉरेन फंडींगच्या आरोपानंतर मौलानांचे हे विधान विशेष चर्चेत आहे. (Foreign Funding Conspiracy)
 
नीट पेपरफुटी विरोधात सुरु झालेल्या सीजेपीच्या आंदोलनाचा कल हा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या शिक्षण मंत्री पदाच्या राजीनाम्याच्या दिशेने होता. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक सीजेपी आंदोलकांनी जल्लोष केला. परंतु मौलाना अबरार जमाल यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे कौतुक करत त्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देत मोठे पाऊल उचलल्याचे म्हटले. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, आंदोलन करणे हा घटनात्मक अधिकार असला तरी राष्ट्रहिताशी तडजोड करून आंदोलन करता कामा नये. देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना ओळखणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. (Foreign Funding Conspiracy)
 
जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या प्रकरणाचा उल्लेख करत मौलाना म्हणाले की, पंतप्रधानांनी संबंधित विद्यार्थ्यांना माफ करून मोठेपणा दाखवला. हे त्यांच्या लोकशाहीवादी विचारांचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीमध्ये मतभेद आणि आंदोलन करणे योग्य असले, तरी कोणत्याही व्यक्तीविषयी, विशेषतः पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणे निषेधार्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Foreign Funding Conspiracy)
 
मदरशांनी धार्मिक शिक्षणापुरते स्वतःला मर्यादित ठेवू
 
मदरशांनी केवळ धार्मिक शिक्षणापुरते स्वतःला मर्यादित ठेवू नये. रोजगाराभिमुख आधुनिक शिक्षणही विद्यार्थ्यांना दिले पाहिजे, जेणेकरून ते राष्ट्रनिर्माण आणि समाजाच्या प्रगतीत प्रभावी योगदान देऊ शकतील. त्यांच्या मते, त्यांची संघटना सुरुवातीपासूनच समान नागरी संहितेच्या समर्थनात असून, देशाला अशा कायद्याची गरज आहे. मदरसे बंद करण्याऐवजी त्यांचे आधुनिकीकरण केले पाहिजे. त्यामध्ये आवश्यक बदल करून शांतता, बंधुभाव आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला जावा. त्यामुळे देशातील वातावरण अधिक सकारात्मक होईल, असे मौलाना अबरार जमाल म्हणाले. (Foreign Funding Conspiracy)
 
हलाला आणि तिहेरी तलाक महिलांवरील अन्याय
 
मौलाना अबरार जमाल म्हणाले की, हलाला आणि तिहेरी तलाक (तीन तलाक) या प्रथांमुळे अनेकदा मुस्लिम महिलांवर अन्याय होत होता. समान नागरी संहिता लागू झाल्यास महिलांना अशा प्रथांपासून पूर्णपणे मुक्ती मिळेल आणि सर्व नागरिकांना समान अधिकार प्राप्त होतील. देशात समान नागरी संहिता लागू झाली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक नागरिक कायद्यापुढे समान राहील आणि स्वतःला सुरक्षित व सन्मानित समजेल, असेही त्यांनी नमूद केले. (Foreign Funding Conspiracy)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर