मुंबई : (Bajrang Dal Movement) जुन्या जालना परिसरातील मटन मार्केटमध्ये गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर परिसरात नुकतेच तणावाचे वातावरण निर्माण झाले. गोवंशाची हत्या झाल्याची माहिती मिळताच बजरंग दल आणि गोरक्षक संघटनांचे कार्यकर्ते पोलिसांसह संबंधित दुकानात पोहोचले. घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली आणि वातावरण तापले.
पोलिसांच्या उपस्थितीतच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा काही नागरिकांशी शाब्दिक वाद झाला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दावा केला की, पोलिसांसमोरच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तसेच धारदार शस्त्राने हल्ला करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. गोवंशाची हत्या आणि कथित गोमांस विक्रीप्रकरणी संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. (Bajrang Dal movement)
महानगरपालिका परिसरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी अवैध मटन मार्केटवर कारवाई करावी, गोवंशाची हत्या रोखावी आणि प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी संबंधित मटन मार्केटच्या संचालनाबाबत महानगरपालिका प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कार्यकर्त्यांचा आरोप होता की, ज्या ठिकाणी मटन मार्केट सुरू आहे ती जमीन महानगरपालिकेची असून, महापालिकेच्या जागेवर बाजार सुरू असतानाही यापूर्वी कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संबंधित बांधकाम तात्काळ हटवून अवैध कारवायांना आळा घालण्याचीही मागणी करण्यात आली.
या संपूर्ण प्रकरणात आता पोलिसांच्या पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोमांस जप्तीप्रकरणी तपासात काय निष्पन्न होते, तसेच मारहाण आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्याच्या आरोपांबाबत पोलिस कोणती कारवाई करतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान महानगरपालिकेने संबंधित मटन मार्केटविरोधात केलेली अतिक्रमण हटाव कारवाईही या वादातील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. सध्या पोलीस आणि प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, परिसरात पुन्हा तणाव निर्माण होऊ नये म्हणून कडेकोट सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे. तपास आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतरच या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.(Bajrang Dal movement)
आंदोलनानंतर महापालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई
धरणे आंदोलन आणि वाढत्या विरोधानंतर महानगरपालिका प्रशासनाने हालचाल करत जुन्या जालना परिसरातील संबंधित मटन मार्केटविरोधात अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू केली. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत बांधकाम हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात घेऊन प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली. महापालिकेच्या कारवाईवेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. महापालिकेच्या कारवाईदरम्यान संबंधित मटन मार्केटवरील बांधकाम पाडण्यात आले. कारवाईनंतर परिसरात तणाव कायम असला तरी पोलिसांच्या उपस्थितीत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कथित गोमांस जप्ती, मारहाणीचे आरोप आणि महापालिकेच्या कारवाईमुळे जुन्या जालना परिसरातील वातावरण सध्या संवेदनशील आहे.(Bajrang Dal movement)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक