मुंबई : (Har Ghar Tiranga) स्वातंत्र्यदिनानिमित्त दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान 'हर घर तिरंगा' अभियान राबवण्यात येणार आहे. प्रत्येकाने घराघरावर तिरंगा फडकवून तसेच सेल्फी अपलोड करून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Har Ghar Tiranga)
या अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, त्यासोबत सेल्फी काढून harghartiranga.com या संकेतस्थळावर किंवा अधिकृत ॲपवर अपलोड करावा. सेल्फी अपलोड करताना #SelfieWithTiranga हा हॅशटॅग वापरण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.(Har Ghar Tiranga)
तसेच अपलोड केलेल्या छायाचित्रावर 'वंदे मातरम्' स्वरचित लोगो दिसणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या राष्ट्रीय अभियानात सर्वांनी सहभागी होऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करावे, असेही सांगण्यात आले आहे. (Har Ghar Tiranga)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....