सनी देओलला मुस्लिम पात्रात प्रेक्षकांनी स्वीकारलं नाही !

शबाना आझमी यांचं मोठं वक्त्यव्य ! Shabana Azmi Sunny Deol

    31-Aug-2026
 
 
shabana
 
 
 
 
 
 
 
मुंबई - (Shabana Azmi Sunny Deol)शबाना आझमी यांचा चित्रपट 'बटवारा १९४७' बॉक्स ऑफिसवर निराशाजनक ठरला. या चित्रपटात सनी देओलने एका मुस्लिम व्यक्तीची भूमिका साकारली होती.शबाना आझमी यांनी आता चित्रपटाच्या अपयशावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, प्रेक्षक सनी देओलला मुस्लिम भूमिकेत स्वीकारू शकले नाहीत.
 
शबाना आझमी म्हणाल्या, 'सर्वात आधी, मला खूप आश्चर्य वाटले कि 'बटवारा १९४७' बॉक्स ऑफिसवर इतका वाईट रीतीने फ्लॉप झाला आहे, कारण माझ्या आजूबाजूचे लोक माझ्याकडे येऊन सांगतात की त्यांना हा चित्रपट खूप आवडला होता.'त्या पुढे म्हणाल्या कि , प्रेक्षकांनी त्यातील मानवतावादी संदेशाचे कौतुक केले, पण लोक चित्रपटगृहांमध्ये गेले नाहीत. सनी देओलची निवड लोकांना आवडली नाही का, असे विचारले असता शबाना आझमी म्हणाल्या, "मुद्दा असा आहे की तुम्ही सनी देओलला मुस्लिम म्हणून स्वीकारू शकत नाही. अमिताभ बच्चन यांनी 'कुली' आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये मुस्लिम पात्रं मोठ्या सहजतेने साकारली आहेत.मग आता अशी वातावरण निर्मिती मुद्दाम केली जाते का ? असा प्रश्न पडला असल्याचेही त्या म्हणाल्या.
(Shabana Azmi Sunny Deol)
 
१४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या 'बटवारा १९४७'ने आतापर्यंत ५३.९६ कोटी रुपये कमावले आहेत, तर त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या इम्रान हाश्मीच्या 'आवारापन २' ने २०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.(Shabana Azmi Sunny Deol)




संबंधित मजकूर