प्रयागराजमध्ये राहुल गांधींचे असत्याचे प्रयोग! ‘एमएसएमई’ वित्तपुरवठ्याबाबतचा दावा सपशेल खोटा

    31-Aug-2026
Jhooth Ki Goonj  
 
मुंबई : (Rahul Gandhi) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रयागराज येथील भाषणातील असत्याची पोलखोल ‘झूठ की गूंज’ या संकेतस्थळाने केली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे दि. ८ ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी देशातील ९० टक्के लहान आणि मध्यम उद्योगांना, बँकांकडून वित्तपुरवठा होत नसल्याचा आरोप केला होता. मात्र, ‘झूठ की गूंज’ या संकेतस्थळाच्या तथ्यतपासणीत हा दावा खोटा ठरला. उलट, २०१४ ते २०२४ या दशकात लहान आणि मध्यम उद्योगांना बँकांकडून होणारा वित्तपुरवठा ८.५ लाख कोटींवरून २७.३ लाख कोटींवर पोहोचला असून, त्यात तब्बल २२० टक्क्यांची वाढ झाली आहे.
 
केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विविध राज्यांत जाऊन सभा घेणारे राहुल गांधी, भाषणादरम्यान ‘खोटे बोला, पण रेटून बोला’ या नीतीचा वापर करत असल्याचे सिद्ध झाले आहे. राहुल गांधींच्या प्रयागराजमधील भाषणातील १२ दावे खोटे, तर चार दावे दिशाभूल करणारे असल्याचे या संकेतस्थळाने म्हटले आहे. त्यात ‘एमएसएमई’ कर्जपुरवठ्याचा दावा विशेष. कारण, एका बाजूला ९० टक्के उद्योगांना कर्ज मिळत नसल्याचे सांगितले जात असताना, दुसर्‍या बाजूला याच क्षेत्रातील कर्जपुरवठा दशकभरात तिपटीपेक्षा अधिक वाढल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. राहुल गांधींच्या दाव्याची खरी अडचण ‘९० टक्के’ या आकड्यापासूनच सुरू होते. हा आकडा कोणत्या अभ्यासातून आला? त्यासाठी किती उद्योगांचा नमुना घेण्यात आला? आणि कोणत्या कालावधीतील कर्जवाटपाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला? याचे स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात आलेले नाही. (Rahul Gandhi)
 
दरम्यान, लघुउद्योगांसाठी केंद्र सरकारच्या ‘मुद्रा’ योजनेतून ४०.०७ लाख कोटी किमतीची ५७.७९ कोटी कर्जे मंजूर झाली आहेत. यातील प्रथम उद्योग करणार्‍यांना १२ लाख कोटी किमतीची १२.१५ कोटी कर्जे देण्यात आली आहेत. पारंपरिक पद्धतीने कर्ज मिळवणे कठीण असलेल्या छोट्या उद्योजकांसाठीही, याच माध्यमातून कर्जाचा मार्ग खुला करण्यात आला. ‘एमएसएमईं’साठी कमाल हमी-बॅक्ड कर्जाचा आकार २ कोटींवरून १० कोटी करण्यात आला असून, अंदाजे २ लाख कोटी अतिरिक्त क्रेडिट उपलब्ध करून देण्यासाठी हमी निधीत नऊ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. (Rahul Gandhi)


डिसेंबर २०२४ पर्यंत ८.०७ लाख कोटींच्या १.०१ कोटी कर्जांना हमी देण्यात आली होती. ‘एमएसएमई’ची व्याप्ती वाढविण्यासाठीही मोठे बदल करण्यात आले असून, सूक्ष्म युनिट्सची गुंतवणूक मर्यादा २५ लाखांवरून अडीच कोटी, म्हणजे दहापट करण्यात आली. लहान आणि मध्यम युनिट्सची मर्यादा अनुक्रमे पाच कोटींवरून २५ कोटीपर्यंत वाढवण्यात आल्याचेही या संकेतस्थळाने म्हटले आहे. (Rahul Gandhi)
 
‘एमएसएमई’ रोजगारनिर्मितीचा दुसरा स्तंभ!
 
भारतीय अर्थव्यवस्थेत ‘एमएसएमई’ क्षेत्र सर्वाधिक रोजगारनिर्मिती करत असून, २०२६ पर्यंत या क्षेत्राने जवळपास ३८ कोटी हातांना रोजगार पुरवला आहे. आजमितीला ‘उद्यम’अंतर्गत तसेच, या क्षेत्राच्या देशाच्या जीडीपीमधील वाटा ३१ टक्के असून, उत्पादनातील वाटा जवळपास ३६ टक्क्यांच्या आसपास आहे, तर देशांच्या निर्यातीत हे क्षेत्र ४८.५८ टक्के योगदान देत आहे. (Rahul Gandhi)
 

 






संबंधित मजकूर