नानी आणि कीर्ती सुरेशच्या जबरदस्त एनर्जीने चाहत्यांना लावलं वेड !

‘द पॅराडाईज’मधील ‘येशा नागुला’ गाणं प्रदर्शित !

    31-Aug-2026
 
 
nani
 
 
 
 
 
 
मुंबई - (Nani keerthy suresh the paradise)‘द पॅराडाईज’मधील दुसरं गाणं ‘येशा नागुला’चा लिरिकल व्हिडिओ अमेरिकेतील डलासमध्ये भव्य पद्धतीने प्रदर्शित करण्यात आला. अनिरुद्ध रविचंदर यांच्या सुरू असलेल्या यूएस म्युझिक कॉन्सर्टदरम्यान स्टेजवर या गाण्याचा लिरिकल व्हिडिओ लॉन्च करण्यात आला, ज्यावेळी नानी आणि कीर्ती सुरेशदेखील उपस्थित होते!
 
‘द पॅराडाईज’ हा भारतीय सिनेमातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात नॅचरल स्टार नानी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीकांत ओडेला यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाने, ‘दसरा’सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर, घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाचा दमदार टीझर, पोस्टर्स आणि गाण्यांनी इंटरनेटवर चांगलीच धूम केली असून, अॅक्शन, ड्रामा आणि थ्रिलने भरलेल्या या चित्रपटाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. (Nani keerthy suresh the paradise)
 
हाय-एनर्जी बीट्स आणि शानदार व्हिज्युअल्सने भरलेल्या या गाण्यात नॅचरल स्टार नानी आणि कीर्ती सुरेश दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ताल धरायला भाग पाडणारे बीट्स, दमदार परफॉर्मन्सची झलक आणि जबरदस्त एनर्जी पाहायला मिळते. दोन्ही प्रमुख कलाकार आपल्या प्रभावी उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. चाहत्यांना त्यांच्या भन्नाट डान्स मूव्ह्जसोबतच मजेशीर आणि कॅन्डिड बिहाइंड-द-सीन्स क्षणांची झलकही पाहायला मिळते, ज्यातून त्यांच्यातील शानदार स्क्रीन केमिस्ट्री आणि मैत्रीची झलक दिसून येते. ब्लॉकबस्टर संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनी आपल्या संगीताची जादू या गाण्यात ओतली असून, त्यामुळे गाण्याची एनर्जी अनेक पटींनी वाढली आहे आणि संपूर्ण ट्रॅक अधिकच धमाकेदार झाला आहे.
(Nani keerthy suresh the paradise)
 
दरम्यान, चित्रपटाची टीम अमेरिकेतील डलासमध्ये पोहोचली होती, जिथे या गाण्याच्या लॉन्चसाठी खास तयारी करण्यात आली होती. नेहमीच्या ऑनलाइन रिलीजपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारत निर्मात्यांनी अनिरुद्ध रविचंदर यांच्या सुरू असलेल्या यूएस म्युझिक कॉन्सर्टदरम्यान स्टेजवर लाईव्ह ‘द पॅराडाईज’मधील दुसरं गाणं ‘येशा नागुला’चा लिरिकल व्हिडिओ रिलीज केला. हा खास क्षण हजारो चाहत्यांसोबत साजरा करण्यासाठी नानीदेखील डलासमध्ये पोहोचला.
(Nani keerthy suresh the paradise)
 
एसएलव्ही सिनेमाजच्या निर्मितीखाली तयार झालेला ‘द पॅराडाईज’ हा चित्रपट २४ सप्टेंबर २०२६ रोजी हिंदी, तेलुगू, तमिळ, इंग्रजी, स्पॅनिश, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा आठ भाषांमध्ये मोठ्या स्तरावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ग्लोबल स्केल लक्षात घेता, निर्मात्यांनी ‘द पॅराडाईज’ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सादर करण्यासाठी हॉलिवूड स्टार रायन रेनॉल्ड्सशी कथितरित्या संपर्क साधल्याचे समोर आले आहे. दमदार दिग्दर्शक, प्रभावी कलाकारांची फळी आणि भव्य ग्लोबल स्केल यामुळे ‘द पॅराडाईज’ हा केवळ एक चित्रपट न राहता एका मोठ्या कल्चरल फेनोमेननच्या रूपात समोर येत आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे. (Nani keerthy suresh the paradise)
 




संबंधित मजकूर