मुंबईतील दहीहंडी व गणेशोत्सवात गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांवर बंदी घाला- मुंबई शिक्षक मंडळाची मागणी

    31-Aug-2026

Gautami Patil
 
 
मुंबई(Gautami Patil's work): “मुंबईतील दहीहंडी, गणेशोत्सव व इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक शालिनता, धार्मिक वातावरण आणि कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नृत्य कार्यक्रमांना सरसकट परवानगी देऊ नये.”अशी आग्रही मागणी मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाने केली आहे.याबाबतची माहिती शिक्षक नेते डॉ.विशाल कडणे यांनी दिली आहे.यासंदर्भात मंडळाने सोमवार दि.३१ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना निवेदन पाठवले आहे.(Gautami Patil's work)
 
या निवेदनात नमूद केले आहे की, “ महाराष्ट्रातील दहीहंडी आणि गणेशोत्सव हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.या उत्सवांमध्ये महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अंतर्गत सार्वजनिक मनोरंजनातील कार्यक्रमांवर सार्वजनिक सुव्यवस्था आणि शालीनतेच्या दृष्टीने नियमन करण्याची तरतूद आहे.”(Gautami Patil's work)
 
निवेदनातील मुख्य मागण्यांमध्ये,“दहीहंडी व गणेशोत्सवातील अशा नृत्य कार्यक्रमांची गाणी, नृत्यप्रकार, वेशभूषा व सादरीकरणाची पूर्वतपासणी करण्यात यावी.पोलीस परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करू दिले जाऊ नयेत.परवानगी दिल्यास वेळ, वेशभूषा व सादरीकरणाबाबत कडक नियमावली लागू करावी.सादरीकरण सार्वजनिक शालिनतेशी विसंगत असल्यास त्वरित परवानगी नाकारण्यात यावी आणि उल्लंघन झाल्यास कडक कायदेशीर कारवाई करावी.बी.एम.सी.द्वारे २०२६ च्या गणेशोत्सवासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन 'सिंगल-विंडो',पोलीस एन.ओ.सी. आणि परवानगी प्रक्रियेत या छाननीचा समावेश करावा.” या सर्व बाबींचा समावेश आहे.(Gautami Patil's work)
 
मुंबई शिक्षक मंडळाने स्पष्ट केले आहे की, “त्यांचा कोणत्याही कलाकाराच्या वैयक्तिक किंवा कलात्मक स्वातंत्र्याला विरोध नाही, परंतु धार्मिक उत्सवांच्या व्यासपीठाचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे.प्रशासनाने या विषयाची गंभीर दखल घेऊन आयोजकांना योग्य त्या सूचना द्याव्यात.”(Gautami Patil's work)





संबंधित मजकूर