ठाणे : (Man Ki Baat)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासीयांना नशामुक्त भारताचा संकल्प करण्याचे आवाहन केले. या अभियानाच्या राज्यातील आयोजनाचा मान ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांना मिळाला. त्यांच्या पुढाकाराने ठाणे स्टेशन रोड येथील ब्राह्मण सभा सभागृहात रविवारी १३७व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरातील विविध समाजघटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत नशामुक्त भारताच्या संकल्पाला पाठिंबा दिला.
ठाणे शहरात आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या सहभागातून ‘नशामुक्त ठाणे शहर’ ही चळवळ राबविण्यात येत आहे. याच कार्याची दखल घेत ‘मन की बात’च्या माध्यमातून नशामुक्त भारत अभियानाच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. (Man Ki Baat)
या कार्यक्रमास कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, आमदार अमित गोरखे, नगरसेविका उषा वाघ, नम्रता कोळी, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी, अमित सरय्या, मंडल अध्यक्ष रोहित गोसावी, विशाल वाघ, नितीन ढमाले यांच्यासह घरेलू कामगार, कोळी समाज, मुस्लिम समाज, व्यापारी वर्ग, मागासवर्गीय समाज आदी विविध घटकांतील नागरिक उपस्थित होते. (Man Ki Baat)
स्वच्छतेच्या धर्तीवर 'नशामुक्त भारत' अभियान जनचळवळ बनवूया
“नशामुक्त भारताची गरज प्रत्येक कुटुंबाला, समाजाला आणि देशाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले आणि त्याला मोठे यश मिळाले, त्याच धर्तीवर नशामुक्त भारत अभियानही जनचळवळ बनवूया. हे अभियान घराघरात आणि मनामनात पोहोचले पाहिजे.” - आ. संजय केळकर, ठाणे (Man Ki Baat)
सुदृढ समाजासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक
सुदृढ मन, शरीर आणि बुद्धी ही व्यक्ती, समाज, शहर आणि देशाच्या विकासासाठी आवश्यक असून, नशामुक्त समाजासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे ठाणेकरांनी एकत्र येऊन ही चळवळ पुढे न्यावी, असे आवाहनही केळकर यांनी केले. (Man Ki Baat)