मुंबई : (JNPA DFC Container Transport) जेएनपीएमधून कंटेनरची जलद आणि सुरळीत वाहतूक करण्यासाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या (डीएफसी) पायाभूत सुविधांचा जेएनपीए नेतृत्वाने आढावा घेतला. अध्यक्ष गौरव दयाल आणि उपाध्यक्ष रवीश सिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह खारबाव रेल्वेस्थानक, भिवंडीतील प्रमुख वेअरहाऊसिंग हब आणि निळजे रेल्वेस्थानकाची पाहणी केली.
खारबाव स्थानकाच्या धोरणात्मक एकत्रीकरणामुळे जेएनपीएमधून भिवंडीतील प्रमुख उपभोग व वितरण केंद्रांकडे कंटेनर वाहतूक अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे. यामुळे वाहतुकीचा वेळ कमी होण्याबरोबरच रस्त्यांवरील वाहतूक कोंडीही कमी होण्याची अपेक्षा आहे. (JNPA DFC Container Transport)
भिवंडीतील पाहणीदरम्यान पुरवठा साखळीची क्षमता, लास्ट-माईल लॉजिस्टिक्स आणि साठवणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. निळजे रेल्वेस्थानकाचा विस्तारत असलेल्या रेल्वे मालवाहतूक व्यवस्थेत अतिरिक्त मालवाहतूक केंद्र म्हणून उपयोग कितपत होऊ शकतो, याचेही मूल्यांकन करण्यात आले. (JNPA DFC Container Transport)
जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल यांनी मल्टिमोडल कनेक्टिव्हिटीचे महत्त्व अधोरेखित करताना डीएफसीच्या माध्यमातून कंटेनर वाहतूक अधिक जलद, सुरळीत आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष रवीश सिंह यांनी कंटेनर वाहतुकीचा अधिकाधिक हिस्सा रस्त्यांवरून रेल्वेकडे वळविल्यास लॉजिस्टिक्सचा खर्च आणि वेळ कमी होण्यास मदत होईल, असे स्पष्ट केले. (JNPA DFC Container Transport)
हा उपक्रम पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनच्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, जेएनपीएची मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी आणि मालवाहतूक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. (JNPA DFC Container Transport)
“आधुनिक बंदरांच्या कार्यक्षम संचालनासाठी प्रभावी मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची आहे. खारबाव आणि निळजे यांसारख्या धोरणात्मक रेल्वे केंद्रांच्या माध्यमातून डीएफसीचा अधिकाधिक वापर करून, भिवंडीसारख्या प्रमुख व्यावसायिक केंद्रांपर्यंत कंटेनरची वाहतूक अधिक सुरळीत, जलद आणि पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यासाठी जेएनपीए प्रयत्नशील आहे.”- गौरव दयाल, जेएनपीए अध्यक्ष
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.