_202608301312005927_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुंबई - (samay raina manoj bajpayee )कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटंट' या शोमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. या शोच्या दुसऱ्या सीझनच्या एका एपिसोडमध्ये समयने बिहारच्या लोकांबद्दल एक विनोदी टिप्पणी केली होती, ज्यावर सर्वत्र टीका झाली आहे. आता मनोज बाजपेयी यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जर तो विनोद असेल तर ठीक आहे. आपण स्वतःवर आणि एकमेकांवर आदराने हसायला शिकले पाहिजे. त्यांनी दिल्लीतील एका बस ड्रायव्हरने त्यांना 'बिहारी' म्हटल्याचा किस्साही सांगितला.
मनोज बाजपेयी यांनी नुकतेच त्यांच्या आगामी चित्रपट 'लास्ट मॅन इन द टॉवर'च्या प्रमोशनदरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्या शोमध्ये घडलेल्या एका घटनेबद्दल विचारले असता, ते म्हणाले, "जर हे सर्व गंमतीने केले असेल, तर मला काही हरकत नाही." शेरन वर्मा आणि समय रैना यांनी शोमध्ये एकमेकांच्या पार्श्वभूमीवरून गंमतीने टोलेबाजी केली होती. (samay raina manoj bajpayee )
या वादावर बोलताना मनोज बाजपेयी म्हणाले, "आपण स्वतःवर आणि एकमेकांवर हसायला शिकले पाहिजे. कोणाच्याही भावना न दुखावता एकमेकांवर हसा आणि नंतर वाईट वाटून घेऊ नका. हेच आपण शिकले पाहिजे. आपल्यात स्वतःबद्दल विनोदबुद्धी असली पाहिजे, पण त्याचबरोबर केवळ स्वतःबद्दलच नव्हे, तर आपल्यासोबत बसलेल्या व्यक्तीबद्दल आणि त्यांच्या पार्श्वभूमीबद्दलही आदर असला पाहिजे. हे खूप महत्त्वाचे आहे. जर दोन व्यक्ती एकमेकांसोबत सहज असतील, तर ते नेहमी एकमेकांवर हसतात." (samay raina manoj bajpayee )
त्यानंतर त्याणी राजधानीतील त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांतील एक प्रसंग सांगितला, जेव्हा एक बस चालक त्याच्याशी कठोरपणे बोलला होता. ते पुढे म्हणाले , "जेव्हा मी दिल्लीत होतो, तेव्हा मी १८ वर्षांचा होतो आणि माझा तो पहिलाच अनुभव असल्यामुळे मी पुढच्या दाराने बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे, मला शहराचे नियम माहीत नव्हते. चालकाने माझ्याकडे पाहिले आणि ओरडला, 'बिहारी, मागच्या दाराने चढ.'"मी बिहारचा आहे हे त्याला माहीत नव्हतं. त्याच्या मते, अशी मूर्ख चूक करणारी प्रत्येक व्यक्ती बिहारचीच असायची. मला वाईट वाटलं नाही कारण, एक तर, मी बिहारचा आहे याबद्दल त्याचं म्हणणं बरोबर होतं. दुसरं म्हणजे, माझंही काही चुकलं नव्हतं, कारण मी त्या शहरात नवीन होतो आणि माझ्यासाठी ते शहर पूर्णपणे अनोळखी होतं.
(samay raina manoj bajpayee )