ठाणे (Ganeshotsav Free Bus Service) : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने शिवसेना कल्याण लोकसभेच्या माध्यमातून यंदाही मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. कळवा, दिवा आणि उल्हासनगर येथे शनिवारी या बससेवेच्या तिकीट वाटपाचा शुभारंभ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
गणेशोत्सवाच्या दोन ते तीन दिवस आधी विशेष बसगाड्या गावाकडे रवाना होणार असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ही सेवा उपलब्ध आहे. दिवा, कळवा, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरातील हजारो चाकरमान्यांना याचा लाभ मिळणार आहे. (Ganeshotsav Free Bus Service)
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) August 30, 2026
गणेशोत्सव काळात रेल्वे आणि एसटीवर वाढणारा ताण, तिकिटांची गर्दी आणि वाढता खर्च लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, प्रवासासोबतच गणपती पूजेसाठी आवश्यक पूजा साहित्यही गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.
मोफत बससेवेमुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून, यावेळी गणेशभक्तांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले. (Ganeshotsav Free Bus Service)