डोंबिवली पश्चिम मंडळ महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

    30-Aug-2026   
Dombivli BJP Women 
 
डोंबिवली : (Dombivli) भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रिया जोशी यांच्या नेतृत्वात डोंबिवली पश्चिम मंडळ महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
 
पक्षाची विचारधारा, संघटनात्मक ताकद आणि जनसेवेचा संकल्प अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी पद देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.याप्रसंगी कल्याण जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष अर्चना सूर्यवंशी, कल्याण जिल्हा संघटन सरचिटणीस रवी सिंग ठाकूर, नगरसेविका ज्योती पाटील, डॉ.रवीना म्हात्रे, मंदा पाटील, मृदुला नाख्ये तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. (Dombivli)
 
यावेळी भाजपा पदाधिकारी प्रदीप जोशी,राहुल म्हात्रे, संजय पाटील, कृष्णा परुळेकर, संदीप ( रमा ) म्हात्रे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. (Dombivli)
 

 





संबंधित मजकूर