आता वाहने एकमेकांशी 'बोलणार'; अपघात टाळण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा प्रस्ताव

Vehicle To Vehicle
 
मुंबई : (Vehicle To Vehicle) रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि वाहन प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. भविष्यात वाहने एकमेकांशी थेट माहितीची देवाणघेवाण (Vehicle-to-Vehicle - V2V Communication) करू शकतील, असा नवा नियम आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मांडला आहे.
 
या तंत्रज्ञानामुळे रस्त्यावर धावणारी दोन वाहने एकमेकांना वेग, दिशा, स्थान आणि अचानक ब्रेक लावल्याची माहिती काही क्षणांत पाठवू शकतील. त्यामुळे चालकाला किंवा वाहनाच्या संगणक प्रणालीला आधीच इशारा मिळेल आणि अपघात टाळण्यास मदत होईल.(Vehicle To Vehicle)
 
उदाहरणार्थ, समोरील वाहनाने अचानक ब्रेक लावला तर तुमच्या वाहनाला लगेच सूचना मिळेल. चुकीच्या दिशेने वाहन येत असल्यास अलर्ट मिळेल. लेन बदलताना धोका असल्यास सूचना मिळेल. रुग्णवाहिका, अग्निशमन दल किंवा पोलिसांचे आपत्कालीन वाहन जवळ येत असल्यास त्याचाही इशारा मिळेल. सध्या अनेक आधुनिक गाड्यांमध्ये सेन्सर आणि कॅमेऱ्यांच्या मदतीने सुरक्षा सुविधा दिल्या जातात. मात्र व्ही टू व्ही तंत्रज्ञानामुळे दिसत नसलेल्या धोक्याचीही आधी माहिती मिळू शकणार असल्याने रस्ते अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.(Vehicle To Vehicle)
 
टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
 
केंद्र सरकारच्या मसुद्यानुसार, दि. १ ऑक्टोबर २०२७ पासून तयार होणाऱ्या L, M आणि N श्रेणीतील (दुचाकी, कार, बस, ट्रक आदी) ज्या वाहनांमध्ये ही प्रणाली असेल, त्यांना AIS-230 या भारतीय मानकांचे पालन करावे लागेल. दि.१ ऑक्टोबर २०२८ पासून तयार होणाऱ्या या सर्व वाहनांमध्ये ही प्रणाली बसविणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे.(Vehicle To Vehicle)
 
संबंधित संस्थांकडून मागविल्या सूचना व हरकती
 
या तंत्रज्ञानासाठी ५.९ GHz फ्रिक्वेन्सी बँड वापरण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र परवान्याची गरज राहणार नाही. या मसुदा नियमांवर ३० दिवसांत नागरिक, वाहन उत्पादक आणि संबंधित संस्थांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या असून, त्यानंतर अंतिम अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.(Vehicle To Vehicle)
 
काय होणार फायदा?
 
रस्ते अपघात कमी होण्यास मदत
चालकाला वेळेआधी धोक्याचा इशारा
आपत्कालीन वाहनांना जलद मार्ग
अधिक सुरक्षित आणि स्मार्ट वाहतूक व्यवस्था
भविष्यात कनेक्टेड आणि स्वयंचलित वाहनांसाठी भक्कम पाया(Vehicle To Vehicle)
 
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर