मुंबई : (Golden Market Sangamner) अहिल्यानगर येथे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या जात असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत संगमनेर शहरात झालेल्या एका मोठ्या छाप्यामुळे या बेकायदेशीर नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे. संगमनेरमधील प्रसिद्ध गोल्डन मार्केटमध्ये एफडीए आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने एका दुकानावर छापा टाकला तेव्हा दुकानातून मोठ्या प्रमाणात बंदी घातलेल्या पाकिस्तानी कॉस्मेटिक्सचा साठा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या छापेमारीत संगमनेर शहरातील गोल्डन मार्केटमधील एका दुकानातून पाकिस्तानात निर्मित 'गोरी ब्यूटी क्रीम' आणि 'गोरी डे अँड नाईट क्रीम'चे पाकिटे मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली आहेत. सुमारे १२,९०० रुपये मूल्याच्या या ब्यूटी प्रोडक्ट्सवर उघडपणे 'मेड इन पाकिस्तान'चा शिक्का मारलेला होता. औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांच्या तक्रारीवरून एफडीएने ही पूर्ण कारवाई केली असून दुकान मालक शाहिद रियाज शेख याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. भारतात कोणत्याही वैध परवानगी आणि परवान्याशिवाय या पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांची उघडपणे विक्री केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.(Golden Market Sangamner)
अधिकाऱ्यांच्या मते, कोणत्याही गुणवत्ता तपासणी आणि मानकांशिवाय भारतात बेकायदेशीरपणे आणले जाणारे हे पाकिस्तानी कॉस्मेटिक प्रोडक्ट्स मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. यामध्ये वापरण्यात येणारी रसायने त्वचेला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संबंधित दुकानदाराविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतात पूर्णपणे बंदी असतानाही या पाकिस्तानी उत्पादनांची सप्लाय चेन कुठून जोडली गेली आहे आणि त्यांना कोणत्या मार्गाने भारतीय सीमेत आणले गेले, याचा तपास आता प्रशासन करत आहे.(Golden Market Sangamner)
खरेदीपूर्वी लेबल नक्की तपासा
संबंधित प्रकरणानंतर एफडीए अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनता, विशेषतः महिलांना आवाहन केले आहे की त्यांनी बाजारातून कोणतेही ब्यूटी प्रोडक्ट किंवा सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना त्याची कंपनी, साहित्य/घटक आणि निर्मितीचा देश चांगल्या प्रकारे तपासून घ्यावा. सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने विनापरवाना विकल्या जाणाऱ्या परदेशी आणि विशेषतः पाकिस्तानी वस्तूंपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.(Golden Market Sangamner)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक