मुंबई : (Jantar Mantar Violence) दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी विरोधात झालेल्या आंदोलनाचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. आतापर्यंत पोलिसांनीच जमावाला हिंसाचारासाठी चिथावणी दिल्याचा आरोप सीजेपी समर्थकांकडून केला जात होता. मात्र सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात पोलिसांनीच ‘कॉकरोच जनता पार्टी’ समर्थकांना आंदोलनात समाजविघातक घटक घुसल्याचा इशारा दिल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात असल्याचे दिसते आहे.(Jantar Mantar Violence)
व्हायरल फुटेजमध्ये नवी दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मा आणि संयुक्त पोलीस आयुक्त दीपक पुरोहित हे सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास आणि अभिषेक रांका यांच्याशी गंभीरपणे चर्चा करताना दिसत आहेत. मात्र, या चर्चेदरम्यान सौरभ दास हे पोलिसांच्या इशाऱ्याला गांभीर्याने न घेता अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही व्हिडिओत दिसत असल्याचा दावा आहे. असा दावा आहे की, हा व्हिडिओ २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनापूर्वी चित्रित करण्यात आला होता. त्यामध्ये पोलीस अधिकारी आयोजकांना स्पष्ट शब्दांत सांगताना दिसतात की आंदोलनासाठी जमलेला जमाव नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो.(Jantar Mantar Violence)
अधिकाऱ्यांनी आयोजकांना इशारा दिला होता की जमावात काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे घटकही उपस्थित आहेत, जे वातावरण बिघडवू शकतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आयोजकांनी तातडीने आपल्या स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, अशी सूचना त्यांनी केली होती. मात्र पोलीस सातत्याने इशारा देत असतानाही सीजेपीच्या आयोजकांनी निष्काळजीपणा का केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(Jantar Mantar Violence)
हिंसक जमावाला पीडित, पोलिसांना खलनायक म्हणून दाखवण्याचा आरोप
‘संसद मार्च’च्या नावाखाली दि. २० जुलै रोजी जंतर-मंतर येथे जमलेल्या जमावाने पोलिसांसह पत्रकारांवरही हल्ले केल्याची घटना घडली होती. या संपूर्ण प्रकरणानंतर काही डाव्या विचारसरणीच्या गटांनी प्रत्यक्षात हिंसक जमावालाच पीडित म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला. तसेच, जखमी पोलिस कर्मचाऱ्यांनाच आरोपी ठरवण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा दावाही केला जात आहे.(Jantar Mantar Violence)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक