मुंबई : (Dr Surendra Jain on Border Encroachments) पश्चिम राजस्थानातील सीमावर्ती भागातील अतिक्रमणे हटविण्याच्या सरकारच्या निर्णयाचे विश्व हिंदू परिषदेने स्वागत केले आहे. उच्च न्यायालयानेही हा निर्णय योग्य ठरवत राष्ट्रसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मुस्लिम समाजाने स्वतःहून सीमावर्ती भागातील बेकायदा बांधकामे हटवून राष्ट्रसुरक्षेला आपले प्राधान्य असल्याचे दाखवून द्यावे. अन्यथा सरकारकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई होणारच, असे मत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी केले.(Dr Surendra Jain on Border Encroachments)
विश्व हिंदू परिषदेच्या जोधपूर प्रांत कार्यसमितीच्या दोन दिवसीय बैठकीत सहभागी होण्यासाठी जोधपूर येथे आले असता, हाऊसिंग बोर्ड परिसरातील अग्रसेन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली.(Dr Surendra Jain on Border Encroachments)
राजस्थानमध्ये वक्फच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित गैरव्यवहारांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, हजारो एकर सरकारी जमिनींवर बेकायदा ताबा मिळवून त्या 'उम्मीद पोर्टल'च्या माध्यमातून नोंदणी करण्याचा कट उघडकीस आला असून, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. केंद्र सरकारने वक्फ कायद्यात सुधारणा केली नसती तर अशा प्रकारचे प्रकार संपूर्ण देशभर घडले असते, असा दावा त्यांनी केला. या प्रकरणात वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अबू सुफियान हे केंद्रस्थानी असल्याचे सांगितले जात असून, वक्फ बोर्डातील काही कर्मचारीही या कथित गैरव्यवहारात सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला.(Dr Surendra Jain on Border Encroachments)
ते म्हणाले की, यंदाचे वर्ष पूजनीय अशोकजी सिंघल यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. अशोकजींचा जोधपूरशी अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या जन्मशताब्दी वर्षाच्या उद्घाटनानिमित्त जोधपूरमध्ये भव्य हिंदू संमेलन आयोजित करण्यात येणार असून, प्रांतातील सर्व जिल्ह्यांमध्येही हिंदू संमेलने घेण्यात येतील. याच अनुषंगाने जिल्हास्तरावर दुर्गावाहिनीचे शौर्य संचलन तसेच युवा संमेलनांचे आयोजन केले जाईल. 'हितचिंतक अभियान' अंतर्गत यंदा विश्व हिंदू परिषद संपूर्ण प्रांतात ५ लाखांहून अधिक सक्रिय सदस्य जोडण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. तसेच विभाग व प्रांत स्तरावर पूजनीय संतांची संमेलने आयोजित करून त्यांना एक-दोन गावे दत्तक घेण्याचे आवाहन करण्यात येईल. या माध्यमातून समाजातील अस्पृश्यता दूर करणे, धर्मांतराला आळा घालणे आणि भारतीय संस्कारांचे संरक्षण करण्यासाठी कार्य करण्याची विनंती केली जाईल.(Dr Surendra Jain on Border Encroachments)
युवकांमध्ये वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी बजरंग दल आणि दुर्गावाहिनीच्या माध्यमातून व्यसनमुक्ती अभियान अधिक वेगाने राबविण्यात येईल आणि राज्यातील युवा पिढीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. तसेच राजस्थानमध्ये गोआधारित शेती आणि पंचगव्याचा प्रसार करण्यासाठी गौरक्षा विभागामार्फत जनजागृती केली जाईल तसेच गोशाळांना प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.(Dr Surendra Jain on Border Encroachments)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक