ग्लासगोत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची दिमाखदार सांगता; भारत ३९ पदकांसह चौथ्या क्रमांकावर!

२०३० च्या ऐतिहासिक १०० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदासाठी भारत सज्ज

    03-Aug-2026   
India Medal Tally
 
मुंबई : (India Medal Tally) ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंनी अतिशय दमदार आणि ऐतिहासिक कामगिरी नोंदवत आपल्या मोहिमेचा यशस्वी सांगता केली. भारताने संपूर्ण स्पर्धेत १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य अशा एकूण ३९ पदकांची कमाई करत पदक तालिकेत मानाचे चौथे स्थान पटकावले. यजमान असलेल्या स्कॉटलंडनेही १३ सुवर्णपदके जिंकली होती, मात्र भारताकडे १७ रौप्यपदके असल्यामुळे भारताने स्कॉटलंडला मागे टाकत चौथे स्थान निश्चित केले. समारोप सोहळ्यात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा ध्वज आणि मशाल अधिकृतपणे भारताकडे सुपूर्द करण्यात आली. ०३० मध्ये राष्ट्रकुल खेळांची १०० वर्षे पूर्ण होत असून, ही ऐतिहासिक शताब्दी आवृत्ती भारतामध्ये अहमदाबाद येथे आयोजित केली जाणार आहे. (India Medal Tally)
 
समारोप सोहळ्यात सुवर्णपदक विजेती बॉक्सर जस्मिन लँबोरिया भारताची ध्वजवाहक होती. औपचारिक ध्वज हस्तांतरण समारंभात ग्लासगोच्या लॉर्ड प्रोव्होस्ट जॅकलिन मॅकलारेन यांच्याकडून राष्ट्रकुल क्रीडा ध्वज खाली उतरवून टप्प्याटप्प्याने दोन वेळचे ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे अधिकृतपणे सोपवण्यात आला. (India Medal Tally)
 

India Medal Tally 
 
याप्रसंगी भारतीय आणि स्कॉटिश कलाकारांनी सादर केलेल्या संयुक्त सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली. भारताने आपल्या सादरीकरणातून समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि आधुनिक भारताची झलक दाखवत संपूर्ण जगाला २०३० मध्ये अहमदाबाद येथे येण्याचे भव्य आमंत्रण दिले. ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांचे प्रतिनिधी एडिनबर्गचे ड्यूक प्रिन्स एडवर्ड यांनी स्पर्धा अधिकृतपणे संपल्याची घोषणा केली. नवी दिल्ली येथील २०१० मध्ये झालेल्या आयोजनानंतर, एकापेक्षा जास्त वेळा या खेळांचे यजमानपद भूषवणारा भारत जगातील दुसरा देश ठरेल.
 
अहमदाबादकडे कॉमनवेल्थ गेम्सचा ध्वज आणि होस्ट बॅटन सोपवणे ही २०३० मधील गेम्सच्या शताब्दी आवृत्तीसाठी भारताच्या तयारीची अधिकृत सुरुवात ठरेल. २०३० च्या गेम्समुळे भारतीय खेळाडूंना विशेषतः युवांना एक मोठे व्यासपीठ मिळेल. अहमदाबादमधील २०३० चे कॉमनवेल्थ गेम्स लाखो भारतीय तरुणांसाठी एक विशाल व्यासपीठ ठरतील.
 
खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यास मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा अर्थसंकल्पात आठपट वाढ केली आहे; तसेच तरुणांना तंदुरुस्त ठेवण्याची आणि त्यांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्याची आजची मोहीम, अधिक तंदुरुस्त आणि सशक्त बनण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचे प्रतिबिंब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे मार्गदर्शन यांच्या जोडीने, उत्कृष्ट दर्जा, अभिमान आणि अद्वितीय आदरातिथ्य यांसह राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे स्वागत करण्यासाठी गुजरात सज्ज आहे. (India Medal Tally)
 
- हर्ष संघवी, उपमुख्यमंत्री, गुजरात
 
१३ पैकी ८ सुवर्णपदकांवर महिलांची मोहोर
 
भारताने जिंकलेल्या १३ सुवर्णपदकांपैकी ८ सुवर्णपदके महिला खेळाडूंनी पटकावली आहेत. वेटलिफ्टिंग, पॅरा अॅथलेटिक्स, ज्युडो आणि बॉक्सिंग या विविध क्रीडा प्रकारांमध्ये महिलांनी सुवर्णपदकांची कमाई केली. पाच महिला बॉक्सरांनी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदके जिंकत भारताच्या बॉक्सिंगमधील वाढत्या सामर्थ्याची प्रभावी झलक दाखवून दिली. ऑलिम्पिक विजेत्या, अनुभवी आघाडीच्या खेळाडू आणि उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडूंच्या एकत्रित कामगिरीमुळे भारतीय महिला खेळाडूंनी देशाच्या मोहिमेचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय यशामुळे नव्या पिढीतील असंख्य मुलींना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन भारताचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची प्रेरणा मिळत आहे. (India Medal Tally)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर