मुंबई : (Air India Building Mumbai) मुंबईतील एअर इंडिया इमारतीचे नूतनीकरण करून राज्य शासनाच्या विविध विभागांसाठी आधुनिक, एकात्मिक आणि नागरिकाभिमुख प्रशासकीय केंद्र विकसित करण्याच्या दिशेने राज्य सरकारने पावले उचलली आहेत. नूतनीकरण करताना नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळतील, विविध शासकीय विभागांचे कामकाज अधिक गतिमान होईल आणि प्रशासकीय रचना लोकाभिमुख असेल, याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. (Air India Building Mumbai)
मुख्यमंत्री निवास 'वर्षा' येथे झालेल्या बैठकीत एअर इंडिया इमारतीच्या संभाव्य नूतनीकरण आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना सर्व संबंधित विभागांची बैठक घेऊन कोणते शासकीय विभाग या इमारतीत स्थलांतरित करणे नागरिक आणि प्रशासनाच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरेल, याबाबत सविस्तर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. अंतिम निर्णय व्यापक प्रशासकीय अभ्यासानंतर घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Air India Building Mumbai)
बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव पंकज कुमार, मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके, वरिष्ठ अधिकारी आणि वास्तुविशारद उपस्थित होते. (Air India Building Mumbai)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.