६० दिवसांत गावदेवी मार्केटचा कायापालट...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण

    29-Aug-2026
Thane market 
 
ठाणे : (Thane Gavdevi Market ) आगीत उद्ध्वस्त झालेल्या गावदेवी मार्केटचे ठाणे महापालिकेने अवघ्या ६० दिवसांत नूतनीकरण करून पुन्हा नागरिकांच्या सेवेत आणले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २७ ऑगस्ट रोजी मार्केटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आग विझवताना शहीद झालेले सागर शिंदे व काळू गाडेकर यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांना शहीद दर्जा देण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे शिंदे यांनी सांगितले.
 
२१ मे २०२६ रोजी शॉर्ट सर्किटमुळे गावदेवी मार्केटला भीषण आग लागली होती. या आगीत सर्व ओटले जळून खाक झाले होते आणि मार्केटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर महापालिकेने युद्धपातळीवर काम करत मार्केटचे नूतनीकरण केले. नव्या मार्केटमध्ये विद्युतीकरण, सीसीटीव्ही यंत्रणा, फायर अलार्म सिस्टीम, रंगरंगोटी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  (Thane Gavdevi Market )
  
६० दिवसांत गावदेवी मार्केटचे नूतनीकरण
 
अवघ्या ६० दिवसांत गावदेवी मार्केटचे नूतनीकरण पूर्ण केल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर, आयुक्त सौरभ राव यांच्यासह ठाणे महापालिकेने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. व्यवसाय करणाऱ्यांनीही सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या.  (Thane Gavdevi Market )
 
 




संबंधित मजकूर