ठाणे: (Thane Civil Hospital) रक्षाबंधनानिमित्त ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालयात हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला. विविध वॉर्डमधील रुग्णांच्या मनगटावर महिला डॉक्टर, परिचारिका आणि महिला कर्मचाऱ्यांनी राखी बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या. कुटुंबापासून दूर असलेल्या रुग्णांना या स्नेहाच्या धाग्यामुळे मानसिक आधार मिळाला.
यावेळी रुग्णांना चॉकलेट व मिठाईचे वाटप करण्यात आले. काही रुग्ण भावुक झाले, तर काहींनी महिला कर्मचाऱ्यांना आशीर्वाद देत कृतज्ञता व्यक्त केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. (Thane Civil Hospital)
यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली राहुड, मेट्रन सारिका शेणेकर, भाग्यश्री बारटक्के, विनोद जोशी आदी उपस्थित होते. (Thane Civil Hospital)
“रुग्ण हा केवळ रुग्ण क्रमांक नसून आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. उपचारांसोबत मायेचा आणि मानसिक आधार देणेही महत्त्वाचे आहे. राखीच्या या धाग्यात प्रेम, विश्वास आणि माणुसकीची ऊब आहे,” असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. (Thane Civil Hospital)