पाकिस्तानात सुमारे 200 वर्षे जुना ऐतिहासिक गुरुद्वारा जमीनदोस्त; मॉलच्या उभारणीसाठी गुरुद्वार्‍याचा विध्वंस

    29-Aug-2026
Pakistan Gurdwara Demolished)
 
इस्लामाबाद : (Pakistan Gurdwara Demolished) बलुचिस्तानातील सुमारे 200 वर्षे जुना ऐतिहासिक श्री गुरु सिंह सभा गुरुद्वारा पाकिस्तानकडून पाडण्यात आला असून, त्या जागेवर एका मॉलचे बांधकाम केले जाणार आहे. पाकिस्तान सरकारच्या या कृतीमुळे जगभरातील शिख समुदायाकडून पाकिस्तान सरकारवर टीका केली जात आहे.
 
बलुचिस्तानचे शोषण करण्याचा विडा उचललेल्या पाकिस्तान सरकारने आता सांस्कृतिक ठिकाणांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून, बलुचिस्तानची राजधानी असलेल्या क्वेटा शहरातील सुमारे 200 वर्षे जुना ऐतिहासिक श्री गुरु सिंह सभा गुरुद्वारा पाडण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाचा बलुचिस्तान गुरुद्वारा सिंह सभेचे सदस्य सरदार जसबीर सिंह यांनी निषेध केला असून, संपूर्ण शीख समाजही याचा विरोध करत आहे. (Pakistan Gurdwara Demolished)
 
गुरुद्वारा पाडण्याच्या निर्णयाबद्दल भारतातूनही तीव्र रोष व्यक्त केला जात असून, गुरुद्वार्‍याला क्षती पोहोचवणे हा पाकिस्तानातील शिखांचा वारसा संपवण्याचा प्रयत्न सरकारचा प्रयत्न असल्याचे, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आरपी सिंह यांनी म्हटले आहे. (Pakistan Gurdwara Demolished)
 
दरम्यान, या गुरुद्वारामध्ये आजवर सेंट गॅब्रिएल शाळा चालवली जात होती. सरदार जसबीर सिंह यांच्या मते, आता त्याच गुरुद्वाराला पाडून येथे शॉपिंग प्लाझाचे बांधकाम केले जात आहे. या प्रकरणात बलुचिस्तान उच्च न्यायालयानेही बांधकाम थांबवण्यास नकार दिला आहे. (Pakistan Gurdwara Demolished)
 
शिख समुदायाच्या मते, ही जमीन श्री गुरु सिंह सभेच्या मालकीची होती. आरोप आहे की इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डने ती एका खाजगी विकासकाला विकली. ही धार्मिक मालमत्ता विकण्याचा अधिकार कोणत्या आधारावर मिळाला बोर्डाला मिळाला आणि जमीन विक्रीची प्रक्रिया काय होती? असा प्रश्न सरकारला विचारण्यात येत असून, यावर पाकिस्तान सरकारने मौन धारण केले आहे. (Pakistan Gurdwara Demolished)
 
पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या आस्थेचा सरकारमान्य विच्छेद!
 
पाकिस्तानमध्ये सातत्याने हिंदूंच्या आस्थेला लक्ष्य केले जात असून, यामध्ये अनेक हिंदू धार्मिक स्थळांना हानी पोहोचवण्यात आली आहे. पाकिस्तानच्या संसदीय समितीने संसदेत सादर केलेल्या अहवालानुसार, एकेकाळी पाकिस्तानमध्ये 1817 हिंदू मंदिरे आणि गुरुद्वारे होते. त्यापैकी सक्रीय धार्मिक स्थळांची संख्या 37वर आली आहे. बलुचिस्तानमध्ये एकेकाळी असलेल्या 12 पैकी 2 गुरुद्वारे सध्या सक्रीय आहेत. फाळणीच्यावेळी प्पाकिस्तानातील शिखांची संख्या 20 लाख होती, 2023च्या जनगणनेनुसार ती आता 15 हजारांच्या आसपास उरली आहे. (Pakistan Gurdwara Demolished)
 
 




संबंधित मजकूर