एका आईचा हात… दुसऱ्या आईसाठी पुढे सरसावला”; रिक्षा मिळेना; नवजात कन्येचा पहिला प्रवास महापौरांच्या वाहनातून

    29-Aug-2026
Mumbai Mayor Ritu Tawde
 
मुंबई : (Mumbai Mayor Ritu Tawde) मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू असताना घाटकोपर येथील संत मुक्ताबाई रुग्णालयाबाहेर आपल्या नवजात कन्येला घेऊन एक आई घरी जाण्यासाठी रिक्षेची प्रतीक्षा करत होती. तासभर वाट पाहूनही रिक्षा मिळत नसल्याने बाळाच्या आईची चिंता वाढली होती. याचवेळी रुग्णालयाची पाहणी करून बाहेर पडलेल्या मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.
 
नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून महापौर तावडे यांनी थांबून बाळाच्या आईची विचारपूस केली. परिस्थिती लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीचा हात पुढे केला. महापौरांनी बाळंतिणीला आणि तिच्या नवजात कन्येला आपल्या महापौर वाहनातून घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली. (Mumbai Mayor Ritu Tawde)
 
खैरानी मार्ग, कुर्ला येथे घरी पोहोचेपर्यंत महापौरांनी बाळाची आपुलकीने काळजी घेतली. घरी पोहोचल्यानंतर नवजात कन्येला आईच्या स्वाधीन करत तिला शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वादही दिला. महापौरांच्या या अनपेक्षित मदतीमुळे बाळाच्या आईच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. (Mumbai Mayor Ritu Tawde)
 
रुग्णालयातून जन्मानंतर पहिल्यांदाच घराकडे निघालेल्या या चिमुकलीचा पहिला प्रवास महापौरांच्या वाहनातून झाला. त्यामुळे हा प्रसंग त्या कुटुंबासाठी भावनिक आणि कायम स्मरणात राहणारा ठरला. पदाची औपचारिकता बाजूला ठेवून एका आईची अडचण दुसऱ्या आईने समजून घेत मदतीचा हात दिल्याने स्थानिक नागरिकांनीही या कृतीचे कौतुक केले. (Mumbai Mayor Ritu Tawde)
 
महापौर तावडे यांच्या या कृतीतून ‘कन्या हीच शक्ती’ आणि ‘माणुसकी हाच धर्म’ हा संदेश अधोरेखित झाला. मोठेपण केवळ पदात नसून ते संवेदनशील मनात असते, हे या प्रसंगातून पुन्हा एकदा दिसून आले. (Mumbai Mayor Ritu Tawde)
 
 




संबंधित मजकूर