मुंबई: (Mumbai Mayor) "रक्षाबंधन सण हा केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून तो प्रेम, विश्वास, काळजी आणि संरक्षणाचा अतूट धागा आहे. दिवस-रात्र सेवा देणारे महापौर बंगल्यातील सर्व कर्मचारी हे आमचे कुटुंबच आहेत," असे भावोद्गार महापौर रितू तावडे यांनी काढले.
भायखळा स्थित महापौर निवासस्थानी महापौर बंगल्यातील सर्व कर्मचाऱ्यांसमवेत रक्षाबंधन सण कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार चित्राताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. (Mumbai Mayor)
रितू तावडे व आमदार चित्राताई वाघ यांनी कर्मचाऱ्यांना स्वतः राखी बांधून त्यांचे औक्षण केले तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उत्सवाच्या काळातही कर्तव्यावर तत्पर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या छोटेखानी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. (Mumbai Mayor)