न्यूयॉर्कच्या इस्कॉनमधून सरसंघचालकांनी दिला श्रीकृष्ण चेतनेतून विश्वऐक्याचा संदेश

    29-Aug-2026   
Mohan Bhagwat New York
 
मुंबई : (Mohan Bhagwat New York) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक इस्कॉन मंदिराला भेट देत बेघरांसाठी अन्नवितरण उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी श्रीकृष्ण चेतनेच्या माध्यमातून जगातील संघर्ष, द्वैत आणि विभाजनावर मात करण्याचा संदेश दिला.(Mohan Bhagwat New York)
 
डॉ. भागवत यांनी न्यूयॉर्कमधील २६ सेकंड अव्हेन्यू येथील त्या ऐतिहासिक स्थळाला भेट दिली, जिथे १९६६ मध्ये इस्कॉनची स्थापना झाली होती.(Mohan Bhagwat New York)
 
इस्कॉनचे गव्हर्निंग बॉडी कमिशनर गौरांग दास यांनी याप्रसंगी माध्यमांशी बोलताना सांगितले की, १९६६ मध्ये स्वामी प्रभुपाद यांनी अधिकृतपणे इस्कॉनची स्थापना केली. आपण ज्या २६ सेकंड अव्हेन्यू येथे उभे आहोत, तेथूनच इस्कॉनचा प्रवास सुरू झाला आणि आज जगातील १२० देशांमध्ये १,३०० मंदिरे कार्यरत आहेत. स्वामी प्रभुपाद यांनी सनातन हिंदू धर्माचा संदेश जगभर पोहोचविण्यात ऐतिहासिक योगदान दिल्याचेही त्यांनी नमूद केले.(Mohan Bhagwat New York)
 
भेटीदरम्यान डॉ. भागवत यांनी अभ्यागत नोंदवहीत संदेश लिहिताना या स्थळाचे विशेष कौतुक केले. “हे प्रेरणादायी स्थान जगाला श्रीकृष्ण चेतनेची अतुलनीय भेट देणारे आहे. प्रत्येक जीव आणि प्रत्येक वस्तूमध्ये वास करणाऱ्या परमात्म्याविषयी शुद्ध सात्त्विक प्रेमाची भावना मनात जागृत झाली आहे.(Mohan Bhagwat New York)
 
हा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.” गौरांग दास यांनी सांगितले की, डॉ. भागवत यांनी जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहनही केले.(Mohan Bhagwat New York)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर