टिटवाळा-कसारा मार्गावर १५ दिवस रात्रीकालीन ब्लॉक; जाणून घ्या, नेमके बदल काय ?

रात्रीकालीन पॉवर-ट्रॅफिक ब्लॉक; १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाट विस्ताराचे काम

    29-Aug-2026
Titwala-Kasara Train Update 
 
ठाणे: (mega block update) १५ डब्यांच्या लोकलसाठी टिटवाळा स्थानकातील फलाट विस्ताराच्या कामासाठी मध्य रेल्वेने २८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ११ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत १५ दिवसांचा विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. दररोज रात्री पाच ते सहा तास ब्लॉक घेण्यात येणार असल्याने टिटवाळा, आसनगाव, वाशिंद आणि कसारा परिसरातील रात्रीची रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहे.
 
पहिल्या टप्प्यात २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान रात्री ११.३० ते पहाटे ५.१० या वेळेत कल्याण-वाशिंददरम्यान ब्लॉक राहणार आहे. या काळात अनेक रात्रीच्या लोकल रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या ठाणे किंवा टिटवाळा येथेच थांबविण्यात येणार आहेत. काही टिटवाळा लोकल आसनगावपर्यंत वाढविण्यात येणार आहेत. (mega block update)
 
ब्लॉकपूर्वी सीएसएमटीहून कसाऱ्याकडे जाणारी शेवटची लोकल रात्री १०.४७ वाजता, तर ब्लॉकनंतर पहिली लोकल पहाटे ४.१९ वाजता सुटणार आहे. कसाऱ्याहून मुंबईकडे पहिली लोकल ३.५१ वाजता, तर टिटवाळ्याहून ४.३२ वाजता सुटणार आहे. (mega block update)
 
या ब्लॉकचा परिणाम मेल-एक्स्प्रेस गाड्यांवरही होणार असून काही गाड्यांना १० ते २० मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे. फलाट विस्ताराचे काम पूर्ण झाल्यानंतर टिटवाळ्यापर्यंत १५ डब्यांच्या लोकल चालविणे सुलभ होणार असले, तरी पुढील १५ दिवस रात्रीच्या प्रवाशांना रेल्वे सेवेतील बदलांचा सामना करावा लागणार आहे. (mega block update)
 
 




संबंधित मजकूर