डोंबिवली: (Marathi language for auto drivers) आपण सर्वजण जातीपातीमध्ये वाटले गेलो आहोत. कोण आपण मराठा आहे तर कोण आपण ब्राह्मण आहे असे बोलत असतो. त्यात अजून भाषिक वाद आणू नका. भाषिक वाद आणून हिंदूमध्ये फूट पाडू नका. त्यामुळे आपण जे हिंदूना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्यात बाधा येऊ शकते असे मत भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी व्यक्त केले.
भाजपा कल्याण जिल्हा यांच्यातर्फे डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या अमराठी बांधवांसाठी विशेष कार्यशाळा पूर्ण केलेल्या रिक्षाचालकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी परब बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर दत्ता माळेकर, प्रकाश तेलगोट,प्रमोद गुरव, संजय तिवारी, किशोर सोरखादे, रवी जाधव, जयनाथ यादव, संतोष आतकरे आदी मान्यवर उपस्थित होते. (Marathi language for auto drivers)
परब म्हणाले, रिक्षाचालकांना मराठी भाषा बोलणे हे सरकारने अनिवार्य केले आहे. मराठी आलीच पाहिजे. आपण जिथे काम करतो त्याठिकाणीच भाषा आलीच पाहिजे. त्यासाठी दंडुकशाही चालणार नाही. एखाद्याला मराठी शिकायला वेळ लागतो. कोणी पटकन भाषा आत्मसात करतो. ज्याला भाषा शिकायला वेळ लागतो त्याला शिकण्यासाठी वेळ दिला पाहिजे. ज्यांना मराठी शिकायची आहे. त्यांना तुमच्या वेळेनुसार आठवडय़ातून एकदा, दोनदा तुम्ही सांगाल त्यानुसार क्लास उपलब्ध करून देऊ. कोणीतरी तुमची फसवणूक करता कामा नये. म्हणून तुम्ही मराठी शिकले पाहिजे असे त्यांनी सांगितले. (Marathi language for auto drivers)
रिक्षाचालकांची जबाबदारी
रिक्षाचालक हा रिक्षादूत आहे. ग्राहकांसाठी थोडे लांब जायला लागले तरी भाडे नाकारू नका. महिलांचा सन्मान राखला पाहिजे. रिक्षाचालक हा तिसरा डोळा असतो. त्यांना शहरात कुठे काय घडते ते पहिल्यांदा समजते. उत्तर भारतीय रिक्षा चालवितात. त्यांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालावधी वाढवून दिला आहे. (Marathi language for auto drivers)
आम्ही प्रशिक्षण शिबीर घेतले त्यात ७०० ते ८०० जण मराठी भाषा शिकले आहेत. आता कालवधी देखील वाढला आहे. त्यामुळे अजून रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकवू. कल्याण डोंबिवलीतील संघटना या प्रशिक्षणात सहभागी झाले पाहिजे असा आम्ही प्रयत्न केला आहे, असे नंदू परब यांनी सांगितले. (Marathi language for auto drivers)