मुंबई : (Kirit Somaiya Egg-Throwing Accused) माझगावचा मोरया गणपती मिरवणुकीवर अंडी फेकणारा आरोपी हा मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी आपल्या प्रेसनोट मध्ये म्हटले आहे. ऑनलाइन स्वरूपात अंडी विकणारा व्यक्ती मनोरुग्ण कसा असू शकतो? असा थेट सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी भायखळा पोलिस स्थानकास दिलेल्या भेटीदरम्यान किरीट सोमय्या यांनी हा थेट प्रश्न विचारला आहे.(Kirit Somaiya Egg-Throwing Accused)
माझगावचा मोरयाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान कॉन्टिनेन्टल हाईट सोसायटी परिसरात एका जिहाद्याने बाप्पाच्या मूर्तीजवळ अंडी फेकली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ३६ तासांत कारवाई करत सदर आरोपी दानिश शेर खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट मध्ये आरोपी दानिश हा मनोरुग्ण असून फटाक्यांच्या धुराचा त्रास झाल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी म्हटले.(Kirit Somaiya Egg-Throwing Accused)
सदर प्रकरणाची दखल घेण्याच्या उद्देशाने किरीट सोमय्या शनिवारी भायखळा पोलीस स्थानकात उपस्थित राहिले. यादरम्यान सोमय्यानी काही मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले, ऑनलाइन स्वरूपात अंडी विकणारा व्यक्ती मनोरुग्ण कसा असू शकतो? अंडी नेमकी कुठून फेकण्यात आली, त्याबाबत सत्यता समोर यायला हवी. आरोपी मनोरुग्ण आहे हे त्याने स्वतः कबूल करत स्टेटमेंट दिले आहे का? आरोपीला हलक्यात घेणे हा गणेशोत्सव मंडळाचा अपमान असल्याचे मत किरीट सोमय्या यांनी यावेळी व्यक्त केले.(Kirit Somaiya Egg-Throwing Accused)
आरोपी दानिश खान याच्याविरोधात कडक कारवाई करन्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववाद्यांकडून करण्यात आली आहे.(Kirit Somaiya Egg-Throwing Accused)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक